चंद्रपूर - पडोली येथून भटाडी कडे जाणारा रोड अपूर्ण असून त्या रस्त्याच्या उरलेल्या भागाला त्वरित मान्यता देऊन रोडचे बांधकाम पूर्ण करावे, व रेल्वे पुलाखालील भाग खोल असून त्या रस्त्याच्या कडेला सुरक्षा भिंत उभारावी तसेच पडोली ते तिरवंजा रोड वरील गावांमध्ये नालीचे बांधकाम करावे यासाठी मनसे तालुकाअध्यक्ष प्रकाश नागरकर यांच्यातर्फे सहाय्यक अभियंता किशोर येडे याना निवेदन देण्यात आले.
तसेच पडोली चौकातून होणाऱ्या जड वाहतुकीमुळे, गाड्यांची वाढती संख्या, व रस्त्यावरील धूळ व रेतीच्या कणांमुळे अपघाताची मालिका वाढली आहे, तसेच मागील दोन महिन्यात यामध्ये तीन लोकांना जीव देखील गमवावा लागला आहे, तरी भविष्यातील अपघात रोखता येईल यासाठी नागपूर रोड व घुग्गुस रोडवर पडोली चौकात ब्रेकर Speed Breaker ला मंजुरी देऊन, रस्ते साफ करण्यात यावे यासाठी राष्ट्रीय महामार्ग कार्यालय चंद्रपूर येथे निवेदन देण्यात आले.
वरील कामांची पूर्तता न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनआंदोलन करेल असा इशारा यावेळी देण्यात आला. Chandrapur MNS party
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार, नागाळा ग्राम पंचायत सदस्य विवेक धोटे, पडोली ग्रामपंचायत सदस्य निशिकांत पिसे, करण नायर उपस्थित होते.