वरोरा - वरोरा येथील आनंदवन चौकात असलेल्या धाब्यावर जुगार खेळताना पैशावरून झालेल्या भांडणात प्रवीण सुधाकर पारखी वय30 वर्ष यास बेदम मारहाण करण्यात आली त्यात प्रवीण गंभीर जखमी झाला, ही घटना दि 9 सप्टेंबर ला रात्रोला घडली.
एकीकडे स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरने सट्टेबाजांवर कारवाई केली मात्र राजकीय पदाधिकाऱ्यांचा जुगार पोलिसांच्या नजरेतून सुटला तरी कसा? यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
माजरी पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या पटाळा या गावातील रहिवाशी प्रवीण हा त्याचा मित्रा सोबत पोळ्याचा जुगार खेळण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांच्या धाब्यावर आला, जुगार खेळात शिवसेना जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांच्यासह अनेक जण जुगार हारल्याने यांनी प्रतीक याला तुझ्या मोबाईल मध्ये सेन्सर लावले त्यामुळे तू जिकलास म्हणून भांडण सुरू झाले, भांडणात प्रतीक यास गंभीर दुखापत झाली यात पोलिसांनी 324, 143, 147, 149 आईपीसी अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनि चार आरोपीस अटक केली असून यात पुन्हा राजकीय पुढारी असल्याची माहिती असून पोलीस गुन्हेगारांचा शोध घेत आहे.