संगीता कार्लेकर
चंद्रपुर प्रतिनिधी
सध्या स्थितीत कोरोनामुळे सर्व काही ठप्प आहे अशा स्थिती शालेय विद्यार्थ्यांना हक्काचे मंच मिळावे नागरिकांचे महिलांचे मनोरंजन व्हावे त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टिकोनातून लिखितवाडा येथे युवकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी,महिलांसाठी विविध कार्यक्रम आयोजन केले होते त्याचे बक्षीस वितरण करण्यात आले.
यावेळी काँग्रेस चे जिल्हा महामंत्री राजविर यादव,माजी उपनगराध्यक्ष चेतनसिंह गौर,शिवसेना तालुका प्रमुख सुरज माडुरवार,ग्राम पंचायत सदस्य संदिप पौरकार,अरुनाताई जांभुळकर,मुख्य आयोजक ऍक्टिव्ह सदस्य कोमलताई फरकडे ,विजय कोडापे, कोहपरे, धंदरेजि,चनकापुरे,सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.