गडचांदूर:- कोरोनाची Corona पार्श्वभुमी लक्षात घेता शासनाने पोळा उत्सव सार्वजनिक ठिकाणी करण्यास मनाई केल्यांने सदर उत्सवावर एकाअर्थी विरजण पडल्याचे चित्र आहे. शासन आदेशाचे पालन करत गडचांदूर शहरात अगदी जल्लोषात साजरा होणारा तान्हापोळा घरीच साजरा करण्यात आला. मागील वर्षी प्रमाणे यंदाही येथील पोळा समिती, पोलीस स्टेशन, नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन Online "तान्हापोळा" स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.यात शहरातील बालगोपालांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.९ आगस्ट रोजी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेतील विजयतांना पारितोषिक Prize वितरण करण्यात आले.
युग सचीन झाडे यांनी मथुरातील श्रीकृष्ण नगरीची प्रतिकृती मांडली व प्रथम क्रमांक पटकवला.देवांश एकरे द्वितीय तर हेमंत परसुटकर व चिन्मय गोरे हे तृतीय पारितोषिकाचे मनकारी ठरले.याच बरोबर पोळा समितीतर्फे स्थानिक न.प.कर्मचारी प्रमोद वाघमारे,बब्लू राठोड,प्रमोद शिंदे यांचा कोविड योद्धा म्हणून शाल,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. नगराध्यक्षा सौ.सविता टेकाम,नगरसेविका मीनाक्षी एकरे,सपोनि प्रमोद शिंदे,स.फौ.शकील अंसारी, व्यापारी असोसिएशन अध्यक्ष हंसराज चौधरी, माजी न.प.उपाध्यक्ष सचीन भोयर, समाजसेवक मनोज भोजेकर,प्रा. अशोक डोईफोडे, प्रा.शरद बेलोलकर, आनंदराव पा.एकरे,पवन राजूरकर, रोहन काकडे,विक्की उरकूडे,उद्धव पूरी,प्रवीण झाडे सह इतरांची प्रामुख्याने उपस्थिती होती. संचालन मयुर एकरे तर आभार रोहन काकडे यांनी व्यक्त केले.