चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यात दारू सुरू होताच गुन्हेगारीने तोंड वर काढले, जिल्ह्यात हत्येच्याया प्रमाणात मोठी वाढ झाली, त्यानंतर जुने वाद उफाळून बाहेर आले, दारूच्या नशेत अनेक खून झाले.
चंद्रपूर जिल्हा क्राईम च्या बाबतीत वरचढ होत आहे, सलग 2 दिवस जिल्ह्यात हत्येच्याया घटनेने खळबळ उडाली, दोन्ही घटनेत एकच गोष्ट साम्य ती म्हणजे दारू, दारूच्या नशेत दोन हत्या झाल्या.
मात्र 11 सप्टेंबरला एक विचित्र घटना समोर आली, जटपुरा गेटजवळ पंचतेली हनुमान मंदिर सध्याचे कोविड चाचणी केंद्रामागे विवाहित महिला व युवक नग्नावस्थेत आढळले.
दुपारच्या सुमारास मंदिराच्या चौकीदाराला काही मंदिराच्या मागे काही आवाज ऐकू येत असल्याने त्याने खिडकी द्वारे डोकावून बघितले असता त्याच्या पायाखालची वाळू सरकली.
एक विवाहित महिला व युवक मंदिराच्या मागे असलेल्या झुडपात नग्नावस्थेत आढळले.
बघता बघता अनेकांची गर्दी त्याठिकाणी जमू लागली, पोलिसांना संपर्क साधला मात्र पोलिसांनी घटनास्थळी यायला 2 तास लावले.
महिलेसोबत असलेल्या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेत विचारपूस केली असता त्याने ती महिला रेल्वे स्टेशनवर भेटली व आम्ही दोघे दारू पिण्यासाठी या ठिकाणी आलो, त्यानंतर आम्ही दोघेही रात्रभर येथेच असल्याचे सांगितले.
महिला दारूच्या नशेत मद्यधुंद होती, तिच्या अंगावर कापड सुद्धा नव्हते, परीसरातील महिलांनी त्या महिलेच्याया अंगावर कापड टाकत, पोलिसांच्या स्वाधीन केले.
त्या महिलेसोबत काही अनुचित प्रकार घडला की काय याची शक्यता आहे, ती महिला जेव्हा शुद्धीवर येणार त्यानंतर ती महिला त्या ठिकाणी कशी आली व नंतर काय झालं हे स्पष्ट होणार.
दारूच्या नशेत आता नागरिक विचित्रप्रकारे वागत असून केव्हा काय करणार याचा सध्यातरी काही नेम नाही.