वरोरा / शासन आणि प्रशासनाकडून शेतकरी हिताच्या वल्गना केल्या जातात, शेतकरी आत्महत्यावर मंत्रिमंडळात खूपसार्या चर्चा केल्या जातात, शेतकरी आत्महत्यावर मुख्यमंत्री, कृषी मंत्री चिंता व्यक्त करते, मात्र वरोरा विधानसभा कार्यक्षेत्रातील लोकप्रतिनिधीकडून मृतक शेतकरी कुटुंबीयांची साधी भेट ही घेतली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. Farmer suicide
भद्रावती तालुक्यातील चंदनखेडा येथे कर्जबाजारीपणामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली माणिक सदाशिव बागेसर असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणामुळे ६ सप्टेंबर रोजी पोळ्याच्या दिवशी चंदनखेडा शेत शिवारातील प्रकाश निमजे नामक शेतकऱ्याच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपविली.दोन दिवस शेतकऱ्याचा शोध घेतल्यानंतर ८ सप्टेंबर रोजी विहिरीत मृतदेह तरंगताना आढळला ही वार्ता वाऱ्यासारखी तालुक्यात पसरली मात्र संबंधित कार्यक्षेत्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी याकडे कानाडोळा करत दुर्लक्ष केले,१० दिवसाचा कालावधी लोटत असतानाही या मृतक शेतकरी कुटुंबियांच्या परिवाराकडे लोकप्रतिनिधीनी पाठ फिरवली असून या प्रकारामुळे चंदनखेडा गावात लोकप्रतिनिधी बाबत उदासिनतेचे वातावरण दिसून येत आहे. हे लोकप्रतिनिधी केवळ People's representative निवडणुकीपुरते सामान्य नागरिकांना हाताशी धरतात निवडून आल्यानंतर लोकप्रतिनिधींना कुणाचेही सोयरसुतक नसल्याचे या शेतकरी आत्महत्याग्रस्त प्रकरणातून दिसून येत आहे. यावर सुज्ञ ignore suicidal farmer families नागरिकांनी चिंतन करण्याची गरज आहे.