घुघुस - जेवण छान नाही बनविल्याने एकाने चक्क आचारीवर chef चाकूने वार करीत जखमी केल्याची घटना घुघुस येथे घडली.
राज्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, 1, 3 , 7 व 10 दिवसांचे गणपती विविध ठिकाणी विराजमान होतात, गणपती विसर्जनाआधी महाप्रसादाचे आयोजन केल्या जाते. Ganesh festival
शहरातील अमराई वार्डात एका घरी गणपती महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, त्याठिकाणी आचारी भीमदीप याने जेवण बनविले.
अनेकांनी जेवणाचा आस्वाद घेतला मात्र महेंद्र सोनिपत याने जेवण छान नाही बनविले म्हणून आचारीवर ओरडायला सुरुवात केली, यावर भीमदीप ने तुला जेवण आवडले नाही तर मी काय करू असे प्रतिउत्तर दिले.
यावर महेंद्र याने त्याठिकाणी असलेला चाकु उचलत आचारी भीमदीप वर वार केले, नागरिकांनी दोघांचा वाद सोडविला मात्र चाकु हल्ल्यात भीमदीप जखमी झाला. Knife attacked
आचारी भीमदीप याच्या पत्नीने याबाबत घुघुस पोलीस स्टेशनला आरोपी महेंद्र विरुद्ध तक्रार दिली, पोलिसांनी तात्काळ महेंद्रला अटक केली असून सध्या आचारी भीमदीप याला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.