पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या वाढदिवशी युवक काँग्रेसचे आंदोलन
प्रतिनिधी/रमेश निषाद
बल्लारपुर : युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या आदेशानुसार आणि माजी खासदार नरेश पुगलिया आणि युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष करण पुगलिया यांच्या मार्गदर्शनाखाली युवक काँग्रेसचे अध्यक्ष चेतन गेडाम यांनी केंद्र सरकारच्या विरोधात धरणे आंदोलन केले. आज केंद्र सरकार रोजगाराच्या मुद्यावर पूर्णपणे गप्प आहे.देशातील बेरोजगारीचा दर एका वर्षात २.४ टक्क्यांवरून १०.३ टक्क्यांवर गेला आहे. सरकार तरुणांना रोजगार देण्यात अपयशी ठरले आहे. युवक काँग्रेसचे अध्यक्ष चेतन गेडाम यांच्या narendra modi नेतृत्वाखाली आंदोलन केले, या कोरोना काळात, लॉकडाऊनमुळे अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या. या देशात बेरोजगारीचे संकट आले आहे. म्हणून नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त युवक काँग्रेसने चेतन गेडाम यांच्या नेतृत्वात आंदोलन केले. यावेळी युवक काँग्रेस महासचिव जुनैद सिद्दीकी,उपाध्यक्ष सिकंदर खान, अझर शेख तालुका अध्यक्ष बल्लारपूर, संदीप नक्षीने, काशी मेंगनवार, इब्बू सिद्दीकी, श्रीखांत गुजरकर, अमर वानखेडे, बुरिया बंधू, अक्षय पापुलवार, नाझीम भाई, सलीम भाई, अनिल, मुबीन शेख उपस्थित होते.
▶️गडचांदूर भाजपतर्फे नरेंद्र मोदींचा वाढदिवस उत्साहात साजरा
प्रतिनिधी/सै. मुमताज अली
गडचांदूर :- गडचांदूर शहर भाजपच्या वतीने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७१ व्या वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या निमित्ताने येथील नगरपरिषदेचे ७१ सफाई कामगारांना किराणा साहित्याचे वितरण करण्यात आले.यावेळी भाजपा शहराध्यक्ष सतीष उपलेंचीवार,नगरसेवक रामसेवक मोरे, नगरसेवक अरविंद डोहे,महामंत्री हरीश घोरे,जेष्ठ नेते संदीप शेरकी,महेताब शेख, चंद्रकांत शिंगरू,भास्कर उरकुंडे,अजी़म बेग,योगेंद्र केवड,इम्रान शेख इतरांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

