चंद्रपूर - शहरातील दुचाकी घटनेत सतत वाढ होत असताना जिल्हा पोलिस अधीक्षक साळवे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला सदर दुचाकी चोरीचा तपास करण्याचे निर्देश दिले होते.
पंचशील नगर तुकूम येथील राहणारे 45 वर्षीय मिलिंद वाघमारे यांनी आपली दुचाकी वाहन क्रमांक MH34AY2670 जटपुरा गेट जवळील खान दवाखान्यासमोर उभी केली होती, काही वेळानंतर परत आले असता त्यांची दुचाकी त्याठिकाणी नव्हती. Two Wheeler theft
वाघमारे यांनी दुचाकी चोरीची तक्रार रामनगर पोलीस स्टेशनमध्ये दिली, त्याचदिवशी अजून एक वाहन चोरी गेल्याची तक्रार प्राप्त झाली होती.
वाहन चोरीच्या घटनेबाबत स्थानिक गुन्हे शाखेने तपास करण्यासाठी पथक तयार केले.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक Chandrapur Local Crime Branch बाळासाहेब खाडे यांनी पथकास पेट्रोलिंग करण्यासंदर्भात सूचना दिल्या.
गोपीनिय माहितीच्या आधारे चंद्रपूर शहरात संशयित राजकुमार धुर्वे याला चौकशीसाठी स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले असता त्याने वाहन चोरी केली असल्याची कबुली दिली.
राजकुमार ने आतापर्यंत एकूण 9 दुचाकी वाहन चोरी केल्या होत्या, स्थानिक गुन्हे शाखेने सदर दुचाकी आरोपी कडून ताब्यात घेत एकूण 4 लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
राजकुमार ने वणी, वरोरा व रामनगर ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी वाहन चोरी केल्या असल्याची बाब उघडकीस आली असून राजकुमार ला अटक करण्यात आली आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, राजेंद्र खनके, दीपक डोंगरे, गणेश भोयर, गोपीनाथ नरोटे यांनी यशस्वीपणे पार पाडली.