राजुरा - मराठी ह्रदय सम्राट मनसे पक्षप्रमुख सन्माननीय राज साहेब ठाकरे यांच्या विचाराशी प्रेरित होऊन तसेच मनसे जिल्हाध्यक्ष दिलीप भाऊ रामेडवार,मनविसे जिल्हाध्यक्ष राहुल भाऊ बालमवार यांच्या नेतृत्वात आणि मनसेचे जिल्हा सचिव किशोर भाऊ मडगुलवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमोद राठोड, गणेश पुसाम, श्रीकांत आडे,सुरज भामरे यांच्या नेतृत्वाखाली चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील नाईक नगर चंदन नगर गावांमधील शेकडो युवकांनी मनसे पक्षाच्या कार्यप्रणालीवर आणि नेतृत्वावर विश्वास ठेवून पक्षप्रवेश करून मनसे पक्षाला गावागावात पोहोचणार अशी हमी दिली या वेळी मनविसे जिल्हा उपध्यक्ष कुलदिप चंदनखेडे चंद्रपूर तालुका अध्यक्ष प्रकाश नागरकर, चंद्रपुर मनविसे तालुका अध्यक्ष विवेक घोटे रूग्णमित्र क्रिष्णा गुप्ता, मनोज तांबेकर, करण नायर,प्रविन शेवते,महेश गपेलीवार,सचिन गुप्ता, राजेश गेडाम आदि मनसैनिक प्रामूख्याने उपस्थीत होते.