प्रतिनिधी/रमेश निषाद
बल्लारपूर:- चंद्रपूर येथील गुरुकुल क्लासेसचे संचालक व बल्लारपूर निवासी रसायनशास्त्र विषयाचे प्रा. योगेश वसंत खेडेकर यांना आचार्य (पी. एच. डी)पदवी गोंडवाना विद्यापीठातून प्राप्त झाली आहे. त्यांचे संशोधनाचा विषय "सिन्थेसिस कॉरेक्टरीझेशन अँड स्टडी ऑफ इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी अँड थर्मोग्राविमेट्रिक एन्यालीसिस ऑफ कंडकटिंग पॉलिमर कम्पोसीट विथ फ्लाय ऍश" हा होता. त्यांना संशोधनात प्राचार्य डॉ. राजेश सिंगरु, ताई गोलवलकर महाविद्यालय, रामटेक यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच प्रा. डॉ. राजीव वेगिनवार यांचे सहकार्य मिळाले.प्रा. योगेश खेडेकर हे बल्लारपूर येथील ज्येष्ठ पत्रकार वसंत खेडेकर यांचे चिरंजीव आहे.या यशात कुटुंबीयांचे व मित्रांचे सहकार्य लाभले अशे प्रा. योगेश खेडेकर म्हणतात.