चंद्रपूर - देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा वाढदिवस देशात शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
विद्यार्थ्यांच्या आयुष्यात शिक्षकांचे योगदान फार मोलाचे असते, मात्र शिक्षकांच्या आयुष्यात काय सुरू असते याची तिळमात्र कल्पना ही आपल्याला नसते. Teacher's day
महाराष्ट्र हे देशातील अत्यंत प्रगत राज्य आहे, मात्र या प्रगत राज्यात अत्यन्त दुर्लक्षित घटक म्हणजे विनाअनुदानित शिक्षक होय.
राज्यात मागील 10 ते 15 वर्षांपासून जवळपास 60 हजार शिक्षक ज्ञानदानाचे काम करीत आहे, देशाची भावी पिढी हा शिक्षक घडवीत असतो मात्र या विनाअनुदानित शिक्षकांना त्यांचा हक्काचा पगार सुद्धा मिळत नाही.
ही खूप मोठी शोकांतिका आपल्या राज्यात बघायला मिळते, राज्यात दर 5 वर्षाला मुख्यमंत्री, सरकार बदलते मात्र बदलत नाही ते विनाअनुदानित शिक्षकांची व्यथा, मागील 15 वर्षांपासून अनुदानाच्या प्रतीक्षेत हे शिक्षक आहे, हक्काच्या पगारासाठी लढणारे हे विनाअनुदानित आजही सर्व समस्यांना सामोरे जात आहे.
शाळेला आज अनुदान येईल, उद्या येणार या प्रतीक्षेत हे शिक्षक आपलं जीवन व्यथित करीत आहे.
अनुदानाची प्रतीक्षा करता करता अनेक शिक्षक पगारविना निवृत्त झाले, काही शाळांना 40 टक्के अनुदान मंजूर करण्यात आले मात्र त्यासाठी शिक्षकाला 100 वेळा आंदोलन करावे लागले.
हक्काचा पगार मिळावा यासाठी शिक्षकांनी पोलिसांचा दंडुक्याचा मार सुद्धा सहन केला.
विनाअनुदानित सेवा करणाऱ्या या शिक्षकांच्या समस्येकडे सरकार लक्ष देणार कधी? आपल्या हक्काची लढाई लढताना शिक्षकांच्या पगाराची पाटी कोरीच असणार काय? हा प्रश्न शिक्षकांना नेहमीच भेडसावीत आहे.
अनुदानित व विनाअनुदानित सेवा देणाऱ्या सर्व शिक्षकांना News34 तर्फे शिक्षक दिनाच्या शुभेच्छा.