चंद्रपूर - शहरातील भिवापूर प्रभागातील जैराम मेडिकलला 2 सप्टेंबर च्या पहाटे 2 ते 2.30 वाजे दरम्यान भीषण आग लागली, या आगीत मेडिकल पूर्णपणे जळून खाक झाले.
या आगीत तब्बल 70 ते 80 लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. Huge fire jairam medical in chandrapur
शहरातील भिवापूर प्रभागातील हनुमान मंदिर जवळील जैराम मेडिकल नेहमीप्रमाणे सुरू होते, रात्री मेडिकल बंद करून मेडिकल संचालक अनिल लालसरे घरी गेले असता त्यांना पहाटे 2 वाजता मेडिकल जवळ राहणाऱ्याने फोन करून मेडिकलला आग लागल्याची माहिती दिली, लालसरे हे ताबडतोब मेडिकल जवळ पोहचले असता त्यामध्ये भीषण आग लागली होती.
नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र तो निष्फळ ठरला, या भीषण आगीत संपूर्ण मेडिकल जळून खाक झाले.
संचालक अनिल लालसरे यांनी दिलेल्या माहितीनुसार या आगीत तब्बल 70 ते 80 लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती दिली आहे.
ही आग नेमकी लागली कश्याने याच कारण अद्याप अस्पष्ट आहे.