वरोरा - बुधवारला पोलिसांना गुप्त माहिती मिळताच बावने लेआऊट मधील काकडे यांच्या घरील दुसऱ्या मजल्यावर खेळत असणाऱ्या क्रिकेट बूकीना Bookie रंगेहात पकडून गजाआड करण्यात आले. वरोरा शहरात मोठ्या प्रमाणात आयपीएल IPL t20 सट्टा सुरू आहे. शहरातल्या ठरलेल्या चौकातील पानठेल्यावर रोज सकाळी हा व्यवहार सुरू असतो. आणि रात्री सात वाजता पासून बुकी आणि फंटर आयपीएल सट्टा लावण्यासाठी सज्ज होतात. खाई लगाई या कोडवर्ड मध्ये यांची लेवान देवान फोन वरून किंवा दिलेल्या साईडवरून सुरू असते.
चंद्रपूर जिल्ह्यात Ipl क्रिकेट मॅच वर कोट्यवधींचा सट्टा लावण्यात येत होता, या ऑनलाइन सट्ट्याचा पोलिसांना सुगावा लागताच कारवाईचे धाडसत्र सुरू केले. Betting
जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे व प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी अवैध धंद्यांवर करडी नजर ठेवून आहे.
पोलिसांच्या कारवाईने सट्टा धारकांचे चांगलेच धाबे दणाणले असून यामधील काही मोठे मासे पोलिसांच्या भीतीने भूमिगत झाले आहे.
Ipl 2021
काल झालेल्या धाडसत्रा मध्ये सिद्धार्थ दुगड हा उदय काकडे रा. बावणे लेआऊट वरोरा यांचे घरी इंडियन प्रीमियर लीग t20 वर लोकांकडून पैसे घेऊन ऑनलाइन सट्टा खेळत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी रंगेहात अटक केली. आरोपी नामे सिद्धार्थ राजेंद्र दुगड वय 23 वर्ष राहणार साईनगर वरोरा, उदय रवींद्र काकडे वय 33 वर्ष राहणार बावणे लेआऊट वरोरा हे इंडियन प्रीमियर लीग t20 वर मोबाईल द्वारे राजस्थान रॉयल व रॉयल चॅलेंजर बेंगलोर या संघावर ऑनलाइन सट्टा खेळताना मिळून आले त्यांच्या ताब्यातून 1,69,170 रू.चा मुद्देमाल मिळून आल्याने जुगार कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला. तिसरा आरोपी मीनाज शेख हा मोरक्या वनीला असल्याने पोलीस तपास करीत आहेत.
सदरची कारवाई आयुष नोपानी उपविभागीय पोलिस अधिकारी वरोरा यांचे मार्गदर्शनात पोनी दिपक खोब्रागडे यांचे अधिपत्यात सपोनि राजकिरण मडावी, सपोनि राहुल किटे, पोउपनी किशोर मित्तरवार, पोहवा दिलीप सूर, नापोशी किशोर बोढे, पोशी सुरज मेश्राम, पोशी कपिल भंडारवार, पोशी प्रवीण निकोडे यांनी पार पाडली
