कोरपना ता.प्र.सै.मूम्ताज़ अली:-
गडचांदूर नगरपरिषद मधील घनकचरा व्यवस्थापनाचे काम चंद्रपूर येथील "युवा कल्याण सुशिक्षित बेरोजगार" (Educated unemployed) या संस्थेला सर्व अटी,शर्ती घालून देण्यात आले.आणि या विषयी सदर संस्थेकडून स्टँप पेपरवर करारनामा सुद्धा करून घेतलेला आहे.असे असताना नगरपरिषदेचे विभाग प्रमुख स्वप्नील पिदूरकर हे त्या ठेकेदारा सोबत संगनमत करून करारनाम्यातील अटी व शर्तींना तिलांजली देत लाखोंचा भ्रष्टाचार करीत आहे. त्यामुळे नगरपरिषदेचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचे आरोप करत याप्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी नगरपरिषदेत विरोधी पक्ष नगरसेवक अरविंद डोहे यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा प्रशासन विभाग न.प.कडे निवेदनाद्वारे केली आहे.
घनकचरा व्यवस्थापन अंदाज पत्रकानुसार मनुष्यबळ न लावता कमी मनुष्यबळ वापरून पूर्ण मनुष्यबळाचे बिल काढले जात आहे. अंदाजपत्रकात नमूद असताना विलीगीकरण केल्या जात नाही. काही अपवाद वगळता अंदाजे ३०० ते ४०० मालमत्ता धारकांकडे घंटागाडी नियमितपणे जाऊन ओला व सुका कचरा वेगवेगळा गोळा करत नाही.वास्तविक पाहता केलेल्या करारनाम्यानुसार प्रती मालमत्ता रु.५० याप्रमाणे बिल कपात करायचे असताना नाममात्र कपात करून बिलाची उचल केली जात असून आरोग्य विभाग प्रमुख व ठेकेदाराच्या संगनमताने मागील दोन वर्षांपासून मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार सुरू असल्याचे आरोप नगरसेवक डोहे यांनी केले आहे.याप्रकरणी बर्याच नागरिकांनी (solid waste management scam) नगरपरिषदेकडे तक्रारी केल्या परंतू त्याला केराची टोपली दाखवण्यात आली."भीम आर्मी" (Bheem army जिल्हा उपाध्यक्ष मदन बोरकर यांनी केलेल्या तक्रारीवर कुठलीही चौकशी होत नसल्याने शेवटी यांनी अन्नत्याग उपोषणाचे (Abstinence fasting) हत्यार उपसले होते. तेव्हा जिल्हाधिकारी यांनी आदेश काढून उपविभागीय अधिकारी राजूरा यांना चौकशी अधिकारी नियुक्त केल्याचे पत्र कोरपना तहसीलदारांच्या हस्ते दिले तेव्हा बोरकर यांनी उपोषण मागे घेतले.
परंतू या गोष्टीला जवळपास एक वर्षाचा कालावधी लोटत आसताना उपविभागीय अधिकारी यांनी यासंदर्भात कुठलीही चौकशी केली नसल्याने विभाग प्रमुखांची हिम्मत वाढली आणि त्यांनी आपल्या भ्रष्टाचाराची मालिका अविरतपणे सुरूच ठेवली असे नगरसेवक डोहे यांचे म्हणणे आहे.२ फेब्रुवारी २०२१ च्या सर्वसाधारण सभेत विषय क्रं.११ घेण्यात आला की, घनकचरा व्यवस्थापनाचा वाढीव नव्याने डी.पी.आर.तयार करावा,चालू असलेल्या ठेकेदाराला एक महिन्याची मुदत देऊन नव्याने निविदा काढावी,असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.परंतू आरोग्य विभाग प्रमुखांनी सभागृहाच्या ठरावाला धुडकावून,टाळाटाळ व विलंब करत असल्याने कदाचित त्याच ठेकेदाराकडे काम ठेवण्याचा त्यांचा मानस असल्याची शंका व्यक्त करत विभाग प्रमुख पिदूरकर यांनी एकअर्थी सभागृहाचा अवमान केल्याचे नगरसेवक डोहे यांचे म्हणणे असून येथील घनकचरा व्यवसथापन ठेक्याची सखोल चौकशी करून दोषीवर कार्यवाही करावी.अशी विनंती वजा मागणी नगरसेवक डोहे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.उपविभागीय अधिकारी राजूरा यांनाही निवेदन पाठवण्यात आल्याची माहिती असून यासंबधी आता काय घडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
------------//--------
सदर प्रकरणी उपविभागीय अधिकारी राजूरा कार्यालया मार्फत चौकशीची कारवाई सुरू आहे. फाईल चेक करणे हे ते सुरू आहे. आणि ते जे डिपीआरचा जे इश्यू आहे.ते डिपीआर वगैरे तयार करून आलरेडी प्रकल्प अडमेस्टेट्यु अप्रोलसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सदर करण्यात आलेला आहे.
"स्वप्नील पिदूरकर"
आरोग्य विभाग प्रमुख
न.प.गडचांदूर.
------------//----------