चंद्रपूर/दुर्गापूर - "नाम मे क्या रखा है" या म्हणीचे जिवंत उदाहरण आज दुर्गापुर पोलिसांच्या कारवाईत बघायला मिळाले, चोरीच्या प्रकरणातील 3 आरोपीना गुन्हे शोध पथकाने काही तासांतच अटक केली.
मात्र यात जो आरोपी मिळाला त्याचं नाव ऐकून पोलिसही काही वेळासाठी आश्चर्यचकित झाले होते कारण या गुन्ह्यात पोलिसांना भूगोल आणि इतिहास एकावेळी मिळाला. Geography history
भूगोल इतिहास मानकर अश्या नावाचा तो आरोपी होता, त्याने बहुतेक शिक्षणात भूगोल इतिहासाचा कधी अभ्यासही केला नसेल मात्र गुन्हेगारीत तो दिवे लावण्याच्या तयारीत होता खरा पण पोलिसांनी गुन्हेगारीचे ते दिवेचं विझवून टाकले.
Crime news durgapur
19 सप्टेंबरला श्रद्धा नगर तुकूम येथील फिर्यादी योगेश्वर दुधपचारे यांच्या घरून लॅपटॉप व ब्लुटूथ स्पीकर चोरी झाल्याची तक्रार दुर्गापूर पोलीस स्टेशनला दिली. Laptop
दुधपचारे यांचा मुलगा आकाश हा रात्री 11 वाजताच्या सुमारास घरच्या टेरेस वरील रूम मध्ये लॅपटॉप वर काम करीत होता, काम झाल्यावर आकाशने लॅपटॉप व स्पीकर त्याचठिकाणी ठेवत खाली आला, आकाशने वरच्या मजल्यावरील रूम ला लॉक मारणे विसरला. Bluetooth speaker
26 सप्टेंबरला जेव्हा आकाश सकाळी लॅपटॉप बघायला गेला असता रूम मध्ये लॅपटॉप व स्पीकर आढळून आला नाही.
सदर घटनेची तक्रार दुधपचारे यांनी दुर्गापूर पोलीस स्टेशनला दिली.
दुर्गापूर पोलिसांनी आव्हानात्मक घटनेचा तपास सुरू केला, पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शोध पथक शाखेचे पोउपनी प्रवीण सोनुने यांनी या प्रकरणी तिघांना अटक केली, चौकशी दरम्यान तिघांनी लॅपटॉप चोरी केला असल्याची कबुली दिली.
आरोपीमध्ये 20 वर्षीय सुलेमान सुलतान शेख, 25 वर्षीय राहुल राजेश मेश्राम व 19 वर्षीय भूगोल इतिहास मानकर तिन्ही राहणारे दुर्गापूर यांना अटक करण्यात आली.
आरोपीकडून एक Samsung कंपनीचा लॅपटॉप कि.अं 20000/रू., एक Bluetooth स्पीकर कि. 5000 /रु., एक गुन्ह्यात वापरलेली होंडा डिओ मोपेड मो./सा.क्र. MH 14 - AZ 8764 कि. 60000/रु., दोन नग अँड्रॉइड मोबाईल कि. 20,000/असा एकुण 1 लाख 5 हजार /रु.चा माल तीन ही आरोपींकडून जप्त करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
सदर गुन्हा स्थानिक गुन्हे शोध पथकाने काही तासातच उघडकीस आणल्याने पोलिसांच्या उल्लेखनीय कामगिरीचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, पोलीस उपविभागीय अधिकारी शिलवंत नांदेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे यांच्या नेतृत्वात डी.बी पथकाचे पोउपनी प्रविण सोनोने, पोहवा सुनिल गौरकार, पोशि मंगेश शेंडे, पोशि मनोहर जाधव आदींनी यशस्वीपणे पार पाडली.