प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मूल - कोरोना प्रादुर्भावामुळे मागील अनेक महिन्यांपासून बंद असलेली गोंदिया - बल्लारशाह Gondia Ballarpur Train ट्रेन ला आजपासून सुरवात झालेली आहे, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यातील अनेक जनता जनार्दन या ट्रेन चा लाभ घेत होती, बस च्या तुलनेत अतिशय अल्प तिकीट असल्याने दवाखाना, व्यापार खरेदी, नातेवाईक, कर्मचारी तसेच छोट्या मोठ्या सर्वच कामासाठी या ट्रेन चा लाभ घेतल्या जात होता, शासनाने सर्व सुविधा सुरू केल्यानंतर सर्वांच्या नजरा आता ही जीवनसांगिनी ट्रेन सुरू होण्याकडे लागल्या होत्या, या संबंधात मुल येथील भाजपा कार्यकर्त्यांनी आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार Sudhir Mungantiwar यांचेकडे पण पाठपुरावा केला होता.
सुधीरभाऊनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे Railway State Minister यांच्याशी बोलून या विषयाची आवश्यकता पण पटवून दिली होती, अखेर या ट्रेनला आज सुरूवात झालेली असून जनसामान्यांची इच्छा पूर्ण झालेली आहे.
ट्रेन सुरू नसल्याने प्रत्येक शहरातील ऑटो चालक, रेस्टरेंट, तसेच अनेक छोटे मोठे व्यावसायिक बेरोजगार झाले होते, आज मुल रेल्वे स्थानकावर भाजपा कार्यकर्त्यांनी सदर ट्रेन चे स्वागत केले, विधिवत ट्रेन ची पूजा करून, ट्रेन चालकाचे सुद्धा पुष्पगुच्छ देत स्वागत केले.
मुल नगर परिषद चे उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे, बांधकाम सभापती प्रशांत समर्थ, ओबीसी नेते राकेश ठाकरे,राकेश मोहूरले, बबलू बुटले, गुणवंतराव गुरनुले, बालगोविंदजी आदे, प्रज्योत रामटेके, श्याम उराडे, कुमार दुधे, बावंनथडे साहेब, गौरव गजापुरे, हेमंत शेंडे तसेच ऑटो संघटना आणि जनता उपस्थित होते. सर्व कार्यकर्ते आणि जनतेनी आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार आणि शासनाचे आभार मानले आहे.