प्रतिनिधी/रमेश निषाद
बल्लारपूर - अंध, अपंग व मानसिक कमतरता असलेल्या नागरिकांना वैधकीय प्रमाणपत्रासाठी 2 महिने वाट बघावी लागत आहे. blind disabled
जिल्ह्यातील ग्रामीण भागातून नागरिक सामान्य रुग्णालयात येत असतात मात्र प्रमाणपत्र वेळेवर न मिळाल्याने त्यांचा वेळ व पैसे वाया जात आहे.
ज्यादिवशी त्यांची वैधकीय तपासणी होते त्याच दिवशी व ठरल्या वेळेवर अंध, अपंग व मानसिक कमतरता असलेल्या नागरिकांना द्यायला हवं, या मागणीसाठी शिवसेनेच्या महिला उपजिल्हा संघटिका कल्पना गोरघाटे यांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांना सदर मागणीचे निवेदन दिले. Shivsena Ballarpur
यावेळी मीनाक्षी गलगट व प्रतीक्षा तेलतुंबडे उपस्थित होते.
