मूल प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल - नैसर्गिक पर्यावरण संवर्धन Conservation of natural environment व मानवता विकास संस्थेचे नागपूर विभागाचे अध्यक्ष दिवंगत मा.प्रा.बहेकार सर आणि शेख झाकिर हुसेन राष्ट्रीय सल्लागार नेफडो तथा महाराष्ट्र पर्यटन Maharashtra Tourism व कला महोत्सव समिती अध्यक्ष यांना मूल जिल्हा चंद्रपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान Chhatrapati Shivaji Maharaj Garden लगत पिंपळ वृक्षाचे रोपण करुन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी मूल नगराध्यक्षा प्रा. रत्नमाला भोयर मॅडम सल्लागार नागपूर विभाग, आशा नागोसे मॅडम नागपूर विभाग उपाध्यक्षा, रत्ना चौधरी मॅडम नागपूर विभाग सचिव,ललिता मुस्कावार मॅडम चंद्रपूर जिल्हा अध्यक्षा, मोहुर्ले मॅडम चंद्रपूर जिल्हा संघटिका,नागोसे सर चंद्रपूर जिल्हा संघटक, शेंडे मॅडम मूल तालुका अध्यक्षा,मुल तालुका संघटिका- वंदना गुरनुले,इंदु वाढई, सुनिता खोब्रागडे, सुजाता बरडे, कल्पना मेश्राम, तालुका संघटक बाबा सुर, पर्यावरण प्रेमी रामदास गुरनुले,रवि बरडे,इंदु मांदाडे, सुर मॅडम उपस्थित होते.
