चंद्रपूर - तुकूम येथील माणिनी बहुद्देशीय महिला मंडळाच्या वतीने गरजवंतांना कपड्यांचे वितरण करण्यात आले.
कपडे जुने झाले की त्याला जाळण्यात येते त्या धुरातून पर्यावरणाला धोका Threat to the environment सुद्धा निर्माण होत असतो, मात्र माणिनी बहुद्देशीय महिला मंडळाच्या अध्यक्षा चैताली नवले यांनी आपल्या संकल्पनेतून ते कपडे गरजवंतांच्या कामी येऊ शकते, म्हणून त्यांनी चंद्रपूर शहरातील नागरिकांना कपडे, खेळणी व पुस्तक देण्याचे आवाहन केले होते.
अनेकांनी या उपक्रमात माणिनी बहुद्देशीय मंडळाला सहकार्य करीत चैताली नवले यांच्या उपक्रमाचे कौतुक सुद्धा केले.Distribution of clothes
सर्व साहित्य जमा झाल्यावर मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी महाकाली मंदिर परिसर, सुमित्रा नगर येथे गरजवंतांमध्ये कपडे, खेळणी व पुस्तकाचे वाटप केले.
सदर उपक्रम यशस्वी करण्याकरिता मंडळांच्या सचीव सौ वर्षाताई सुरंगळीकर ,सौ.सवीता पोले, भारती उपाध्ये,सौ गोरडवार ,सौ,भोगेकर मोनाली कोसे यांनी अथक परिश्रम केले.