चंद्रपूर - शहरात घडलेले घरफोडीचे गुन्हे लवकर उघडकीस आणावे यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना याबाबत निर्देश दिले होते. Lcb chandrapur
खाडे यांनी त्या दिशेने तपास सुरू केला असता 26 सप्टेंबरला पहाटेच्या सुमारास 2 अल्पवयीन मुले संशयास्पद पद्धतीने फिरताना आढळले, गुन्हे शाखेने दोन्ही मुलांना विचारपूस केली असता रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत 4 घरफोड्या केल्या असल्याची कबुली दिली. Crime chandrapur
घरफोडीनंतर काही मुद्देमाल स्वतःच्या घरी व एका महिलेकडे ठेवला असल्याचे सांगितले असता स्थानिक गुन्हे शाखा कर्मचाऱ्यांनी सोने, चांदीचे दागिने व रोख रक्कम व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण 79 हजार 580 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. Burglary
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी यशस्वीपणे पार पाडली.