चंद्रपूर - जिल्ह्यात मागील महिन्यात जिवती तालुक्यातील वणी खुर्द या गावी जादूटोण्याच्या संशयावरून 2 कुटुंबांना बांधून मारहाण करण्यात आली होती, त्यानंतर नागभीड येथील मीनडाला गावात जादूटोण्याच्या संशयावरून वृद्ध महिलेसह मुलांना मारहाणीची घटना घडली, 2 दिवसानी पुन्हा चंद्रपूर शहरात असाच प्रकार घडल्याने पुरोगामी महाराष्ट्रात नेमकं चाललं तरी काय? असा प्रश्न आजघडीला उपस्थित झाला आहे.
विज्ञान आज पुढे गेले असले तरी अंधश्रद्धा मात्र कायम आहे, कुणी बिमार झाला तर त्याला डॉ जवळ नेण्याआधी त्यांच्या कुटुंबातील सदस्य भानामती करणाऱ्या जवळ घेऊन जात असतात, बिमार कसे झाले तर भानामती करणारे जवळच्या व्यक्तीचे नाव सांगून मोकळे होतात व त्यानंतर ही अंधश्रद्धा आक्रोशाच्या भावनेत पार बदलून जाते.
अशीच एक घटना चंद्रपूर शहरातील भिवापूर प्रभागात घडली.
राम पडदेमवार हे कॅन्सरच्या आजाराने ग्रस्त होते, त्यांच्यावर उपचारही सुरू होते मात्र पडदेमवार परिवारातील काहींनी हा भानामतीचा प्रकार आहे, कुणीतरी जादूटोणा केला असेल म्हणून राम हे कॅन्सर सारख्या आजाराने ग्रस्त झाले, सर्वांनी संशय सुद्धा नात्यातील लोकांवर घेतला.
राम यांचे नातेवाईक आशालू पडदेमवार, सिंनू रादंडी, सपना, नरसिंग पडदेमवार, मंनुबाई रादंडी, रवी आशावर, मंगेश पडदेमवार यांनी संगनमत करून पूजा नारायण पडदेमवार सहित वडील, भाऊ व बहिणीला बेदम मारहाण केली.
सदर मारहाणीनंतर पूजा यांनी शहर पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली.
शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर आंभोरे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत सर्व आरोपींना ताब्यात घेतले व जादूटोणा प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.