चंद्रपूर - कोरोना महामारीत मागील दीड वर्षांपासून राज्यातील प्रार्थनास्थळ व मंदिरे बंद आहे, ते लवकर सुरू करावे यासाठी चंद्रपूर मनसेने महाकाली मंदिर परिसरात घंटानाद आंदोलन केले.
मविआ च्या तिनतिघाडा कारभारात महाराष्ट्राच वाटोळं होत आहे, सत्तेत मदमस्त असलेल्या सरकारला जागे करण्यासाठी मनसेने जोरदार नारेबाजी करीत आंदोलन केले.
नागरिकांचे श्रद्धास्थान असलेले प्रार्थनास्थळ उघडल्याने कोरोनाचा प्रकोप वाढणार ही भावना मनातून सरकारने काढून टाकावी, कारण सरकारचे मंत्री दौऱ्यावर असताना मोठ्या प्रमाणात कार्यक्रम घेत असतात तर त्यावेळी तिथे जमलेल्या गर्दीने कोरोना होत नाही का? नागरिकांच्या श्रद्धास्थान मंदिरे उघडली तेव्हाच कोरोना होतो का? असा प्रश्न यावेळी मनसेने मविआ सरकारला विचारला.
यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष दिलीप रामेडवार, मनवीसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार, महिला सेना जिल्हाध्यक्ष सुनीता गायकवाड, तालुकाध्यक्ष प्रकाश नागरकर, विवेक धोटे, कुलदीप चंदनखेडे, मनोज तांबेकर व मनसैनिकांची उपस्थिती होती.