बल्लारपूर - दि. 03/09/2021 रोजी बेटी फाउंडेशन च्या महिलांची बैठक पार पडली, बेटी फाउंडेशन ही एक सामाजिक संस्था असुन दरवर्षी ह्या संस्थे मार्फत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार महोत्सव साजरा केल्या जातो ह्या महोत्सवात संपुर्ण भारत देशातील समाजसेवक, कलावंत,शिक्षक इ. सहभागी असतात.
यामध्ये काही प्रस्ताव विदेशातुन ही येतात परंतु कोविड मुळे विदेशी प्रस्ताव नाकारण्यात आले आहेत, दि. 26 सप्टेंबर ला वणी येथे प्रिंन्स लाॕन मधे सायंकाळी पाच वाजता हा सोहळा पार पडणार आहे, ह्या महोत्सवात देशभरातील 51 मान्यवरांची नियुक्ती करण्यात येते आणि हा संपुर्ण सोहळा शांततेत पार पडावा म्हणुन बेटी फाऊंडेशन च्या महिलांनी उत्कृष्ट असे नियोजन केले असल्याचे आणि वणीकरांनी कार्यक्रमाला हजर राहण्याचे आवाहन बेटी फाउंडेशन च्या अध्यक्षा प्रिती दरेकर ह्यांनी केले.
बेटी फाउंडेशन मधिल सदस्या दर्शना पाटील,मिना वानखेडे,अनुराधा आवारी, प्रिया नीखार, जान्हवी बांगडे, कल्पना बरडे, शामल बरडे, सुनंदा गुहे, लता झिल्पे आणि रजनी पोयाम ह्या सर्व महिला परिश्रम घेत असल्याचे ही प्रिती दरेकर ह्यांनी सांगितले.