प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल - मुल-पोंभुरणा-सावली हे तीनही तालुक्यातील हजारो हेक्टर शेती वाघाचे व जंगली प्राण्यांचे वावर असलेल्या जंगलाला लागून आहे. शेतात धानाची रोवणी होऊन निंदनाचेही काम पूर्ण होत आहेत. धान पीक आता गर्भात (पोटऱ्या) येण्याची वेळ येत आहे परंतु जस-जसे पीक वाढायला लागले तसे रानटी डुकरांचा Wild boar हैदोस सुद्धा वाढत जात आहे. धान पिकासोबत दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांनी पाळीवर तूर , तिळ, वाल, आणि पोपट पिकाची लागवड केलेली आहे या पिकांची झाडे मोठी झाली असून तिळ पिकाला बोनद्या यायला सुरुवात झाली असून तुरीचे पीकही शेतकऱ्यांच्या हाती येण्यासारखे आहे. परंतु रानटी डुकरांच्या हैदोषाने धान, तीळ,तूर, कापूस या सर्व पिकाची नासाडी करीत असल्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती येणारे पीक नष्ट होत असल्याने तिन्ही तालुक्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. रानटी डुकरांचा कळपच शेतात रात्रीच्या वेळेला घुसून पिकाची नासधूस करीत आहेत त्यामुळे हाती येणाऱ्या मालाची अतोनात नुकसान होत आहे डुकराच्या कळपाच्या हैदोषाने शेतकरी बांधवही रात्रीच्या वेळेला शेतात जायला घाबरत आहे. अशा वेळेला तिन्ही तालुक्यातील वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी आपले रानटी डुकरे आपल्या जंगलात बंदीस्थ करून ठेवावे. अन्यथा शेतकऱ्यांना डुकरे मारण्याची परवानगी द्यावी अशी मागणी तिन्ही तालुक्यातील असंख्य शेतकरी बांधवांच्या वतीने चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष तथा माजी जि. प.अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी केली आहे. येत्या १० दिवसात डुकरांचा बंदोबस्त वनविभागाने केला नाही तर असंख्य शेतकरी बांधवाना सोबत घेऊन जण आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे. बिचारा बळीराजा शेतकरी मोठ्या मेहनतीने कष्टाने धान, कापूस, तूर,तीळ, सोबत पोपट,वॉल, याची महागडी बिजाई घेऊन लावणी केली आहे. धान व कापूस पिकाला येणारा खर्च शेतकऱ्याला परवडणारे नाही म्हणून काही प्रमाणात बियाणे व रोवणी,निंदणी करण्याचा काही खर्च निघू शकते या हेतूने तूर, तिळ,पोपट,वॉल असे अंतर्गत पिके घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु रानटी Farmers' Problems डुकरांचा कळप शेतात यायला लागला असून डुकरांच्या भीतीमुळे शेतकरी बांधव ,शेतकऱ्यांची पत्नी,मुले,शेतात जाण्यासाठी घाबरत आहेत. एकीकडे वन्यप्राण्यांची भीती तर दुसरीकडे हाती येणाऱ्या पिकांची नासाडी आशा संकटात शेतकरी सापडला आहे. बळीराजा शेतकरी बांधव शेतात लावलेल्या पिकाचे पालन करते तर शासनाचा वनविभाग रानटी डुकराचे पालन करते. अशा अवस्थेत शेतकऱ्याच्या पिकाच्या नुकसानीला जबाबदार कोण ,असा प्रश्न शेतकरी बांधव करीत आहे. ज्या पद्धतीने आमचे पाळीव जनावरे बैल,गाय, म्हैस, शेळ्या, मेंढ्या यांची जोपासना शेतकरी बांधवच करतो, त्याच प्रमाणे वनविभागाने आपल्या डुकरांचा बंदोबस्त वनविभागानेच करावा अन्यथा आपल्या जंगल एरियाला चौफेर तारांचा कुंपण करुन रानटी डुकरांचा बंदोबस्थ आपणच करावा, अन्यथा शेतकऱ्यांना डुकरे मारण्याची परवानगी द्यावी अशी मागणी मुल- पोंभुरणा- सावली तालुक्यातील असंख्य नुकसान ग्रस्त शेतकरी बांधवांच्या वतीने केली आहे. मागील वर्षी याच शेतकऱ्यांनि धान पीक निघाल्यावर खरीप पिकामध्ये, तूर, चना, लाकेचे उत्पन्न लावले होते परंतु ही सर्व पिके फुलांवर -फळांवर आल्यानंतर,तुरीला शेगा, लाकेला शेनगा लागल्यावर याच रानटी डुकराच्या हैदोषाने संपूर्ण पिकच नष्ट केले होते. याबाबत अनेक शेतकऱ्यांनी नुकसानीची भरपाई मिळावी म्हणून वनविभागाकडे लेखी अर्ज केला होता त्यानुसार वन विभागाकडून मोका चौकशी सुद्धा करण्यात आली होती परंतु एक वर्षाचा कालावधी पूर्ण होत आहे तरी देखील नुकसान झालेल्या व विनंती अर्ज केलेल्या शेतकरी बाधवांना कुठलीही नुकसान भरपाई मिळाली नाही. तसेच वनविभागाने काही तालुक्यातील ठराविक शेतकऱ्यांना वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या मार्फतीने सोलर वर करंट लागण्याचा कुंपण तार पुरविले परंतु मुल तालुक्यातील वनविभागाने forest ही योजनाच अमलात आणल्याचे दिसत नाही. करिता सर्वच शेतकऱ्यांना कुंपण तारेचा तात्काळ पुरवठा करावा. तसेच शेतकऱ्यांच्या रानटी डुकराने केलेल्या पिकाच्या नासाडीची मान. जिल्हाधिकारी यांनी मोका चौकशी करुन संबंधित शेतकऱ्यां सोबत प्रत्यक्ष चर्चा करुन वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यां करवी प्रत्यक्ष चौकशी करून नुकसान ग्रस्थ शेतकऱ्यांना मदत मिळून द्यावी. आणि मागील वर्षी झालेल्या नुकसानीची भरपाई त्वरित देण्यात यावी अशी मागणी देखील असंख्य शेतकरी बांधवांच्या वतीने मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष cdcc bank chandrapur संतोषसिंह रावत यांनी केली आहे.
आपली मागणी बरोबर आहे साहेब
उत्तर द्याहटवाफैसला ऑन दी स्पॉट