चंद्रपूर - शहरातील गांधी चौकात gandhi chauk 17 सप्टेंबरला भर दुपारी गोपालपुरी वार्ड निवासी मेघश्याम वरारकर यांची दुचाकी चोरी झाल्याची तक्रार शहर पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली होती. Chadrapur city police
शहर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला असता संशयित घुटकाला निवासी 37 वर्षीय रसूल शेख याला पोलिसांनी ताब्यात घेतले. Bike theft
पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने दुचाकी चोरी केली असल्याची कबुली देत पुन्हा 4 दुचाकी चोरी केल्याचे उघडकीस आले.
पोलिसांनी रसूल जवळून एकूण 5 दुचाकी वाहन जप्त केले, त्यामधील 4 दुचाकी वाहन चोरीचे गुन्हे हे शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल असून 1 दुचाकी लावारीस अवस्थेत आढळली.
आरोपीला ताब्यात घेत त्याचेंजवळून एकूण 2 लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदरची कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पोलीस निरीक्षक सुधाकर आंभोरे यांच्या नेतृत्वात शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे पोउपनी वाघमारे, विजय कोरडे, दौलत चालखुरे, रामकीसन सानप, जयंता चुणारकर यांनी यशस्वीपणे पार पाडली.