चंद्रपूर/दुर्गापूर - स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी चोरीचे मोठे प्रकरण घडत आहे, घरफोडी असो की चैन स्नाचिंग मात्र पोलिसांच्या सतर्कतेने या घटनांना काही प्रमाणात आळा बसला आहे.
दुर्गापूर पोलीस स्टेशन हद्दीतील समतानगर परिसरात चोरीचा नवीन व थक्क करणारा प्रकार समोर आला, 2 युवकांनी वृद्ध महिलेच्या घरी जात "आम्हाला तहान लागली आहे, पाणी मिळेल काय?" असे म्हणत त्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावीत पळून गेले, हा प्रकार भर दिवसा घडल्याने नागरिकांनी सतर्क रहावे घरी कुणी अनोळखी इसमाला प्रवेश देते वेळी आधी खातरजमा करून घ्या असे आवाहन पोलिसांनी केले आहे. Durgapur police station
दुर्गापूर पोलीस स्टेशन हद्दीत 31 ऑगस्टला 59 वर्षीय रुखमाबाई भाऊराव पेंदोर या घरी असताना दुपारी 3 वाजता 2 अनोळखी दुचाकीस्वार पाणी पिण्याचा बहाणा करीत त्यांच्या घरी शिरले व रुखमाबाई यांच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावीत पळून गेले, दुपारची वेळ असल्याने पेंदोर यांनी आरडाओरड केली मात्र ते अज्ञात दुचाकीस्वार पळून गेले.
या चोरीच्या घटनेची पेंदोर यांनी दुर्गापूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली.
पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंद करीत आरोपींचा शोध सुरू केला पोलिसांनी 2 युवकांना ताब्यात घेत चौकशी सुरू केली.
यात त्या दोघांनी सोन्याची चैन हिसकावली असल्याची कबुली दिली.
आरोपी 21 वर्षीय विभान्शू देवेंद्र बोकडे, 18 वर्षीय ओम सतीश अल्लेवार, रा भानपेठ दोघांना पोलिसांनी अटक करीत त्याचेंजवळून चोरीस गेलेला सोन्याचा गोफ, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, दोन अँड्रॉइड मोबाईल असा एकूण 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदरची कारवाई दुर्गापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे, पोउपनी प्रवीण सोनोने, सुनील गौरकार, मंगेश शेंडे, मनोहर जाधव व किशोर वलके यांनी यशस्वीपणे पार पाडली.