चंद्रपूर - देशातील 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ताडाळी येथील बुद्ध विहारात "कर्म से कामयाबी" या संस्थेद्वारे मुलांना बिस्कीट, मिठाई व योगा चे महत्व यावर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. News 34
आयोजित कार्यक्रमात संस्थेच्या अध्यक्षा दुर्गा श्रीवास (मंजू रजक) , उपाध्यक्ष एड. इतिका साहा, सल्लागार डॉ. ममता ठाकुरवार, सचिव राकेश सैनी, रामटेके गुरुजी, शारदा गेडाम, उमा शर्मा, अलका वाडेकर, ज्योती कोठेकर, बालकिशन आदींची उपस्थिती होती.
यावेळी संस्थेच्या अध्यक्षा दुर्गा श्रीवास यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करीत 75 वा स्वातंत्र्य दिनाचे महत्व सांगत अनेक महापुरुषांनी आपल्या बलिदानाने या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ताडाळी ग्राम पंचायतचे उपसरपंच निखिलेश चामरे व संस्थेच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.
