कोरपना ता.प्र.सै.मूम्ताज़ अली:-
गडचांदूर येथे पुर्वी ग्रामपंचायत सरपंच आणि आताच्या नगरपरिषद नगराध्यक्षाच्या कार्यालयीन इमारतीवर असलेली "आटोमेटिक पोल्युशन डाटा रिकार्डर मशीन" महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ(एमपीसीबी)प्रादेशिक कार्यालय चंद्रपूर यांना परत करण्याची मागणी सत्तापक्ष काँग्रेसचे गटनेते विक्रम येरणे यांनी नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. News34
या विषयी सविस्तर असे की, शहरातील प्रदूषणाची आकडेवारी गोळा करण्यासाठी पीएमसीबी मार्फत "आटोमेटिक पोल्युशन डाटा रिकार्डर मशीन" लावण्यात आलेली आहे.परंतू ही मशीन कागदोपत्री प्रदूषणाची आकडेवारी कमी व खोटी दाखवत असल्याचे म्हणत यामुळे शासनाची मोठ्याप्रमाणात दिशाभूल आणि जनतेची फसवणूक होत असल्याचे आरोप गटनेता विक्रम येरणे यांनी केले आहे.वास्तविक पाहता या मशीनमध्ये विशिष्ट असा कागद टाकून अंदाजे ८ ते १० तास याला सुरू ठेवले जाते.नंतर तो कागद काढून चंद्रपूर येथील प्रयोग शाळेत पाठवून प्रदुषणाची आकडेवारी काढली जाते.यासर्व प्रक्रियेसाठी "एमपीसीबी" मार्फत एका एजन्सीची नेमणूक करण्यात आली आहे.
मात्र मागील अंदाजे ६ ते ७ वर्षापासून सदर एजन्सीकडून कोणताही व्यक्ती याठिकाणी येत नसल्याचे निदर्शनास आले आहे.मशीन सुरू असल्यास याचा आवाज येत असतो अशी माहिती आहे.परंतू आजपर्यंत याबद्दल कोणीही कोणालाच सांगितले नाही.सदर मशीन उपयोगात नसून याची आकडेवारी एमपीसीबी कार्यालयात सादर केली जात नाही.बोगस आकडेवारीमुळे शहरात वाढलेल्या प्रदुषणाची नोंद शासन दरबारी होत नाही. यामुळे निव्वळ कागदोपत्री प्रदूषणाची कमी आकडेवारी दाखवून शासनाची दिशाभूल तसेच जनतेची फसवणूक होत आहे.यासर्व बाबी लक्षात घेऊन सदर मशीन नगरपरिषदेने काढुन एमपीसीबी कार्यालयाला परत करावी अशी मागणी वजा विनंती निवेदनातून गटनेता येरणे यांनी केली आहे.आता याविषयी काय निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
