चंद्रपूर - घुघुस शहरातील अमराई वार्डात सूरज माने नामक युवकाने अंगणातील झाडाला गळफास घेत आत्महत्या केली, त्याची पत्नी रत्नमाला घरातील आतील बाजूस बेशुद्ध अवस्थेत आढळली होती, तिला पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान रत्नमाला चा मृत्यू झाला.
दोघांची हत्या करण्यात आली असल्याचा आरोप मृतक रत्नमाला चा भाऊ किशोर कोलीयन याने पत्रकार परिषदेत केला आहे.news34
किशोर ने आरोप केला की सुरज माने यांच्या शरीरावर अनेक जखमा आढळल्या व मृतक रत्नमाला यांच्या डोक्यावर गंभीर जखम असल्याचे निदर्शनास आले त्यावरून या दोघांची हत्या झाली आहे व ही हत्या माने यांच्या शेजारी राहणारा विनोद सरोज याने केली असल्याचा आरोप केला आहे.
माने दाम्पत्यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्यात यावी व आरोपी सरोज यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करावा, कारण सरोज याने काही दिवसांपूर्वी सूरज माने याला जीवानिशी ठार मारणार असल्याची धमकी दिली असा आरोप किशोर कोलीयन यांनी केला आहे.
याबाबत आम आदमी पक्षाच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलिस अधीक्षक साळवे यांना निवेदन दिले आहे.
आयोजित पत्रकार परिषदेत विधानसभा प्रमुख हिमायू अली, अमित बोरकर, राजू वनकर, सौरभ घोंगडे आदींची उपस्थिती होती.
