चंद्रपूर - चंद्रपुर जिल्ह्यात डेंग्यूचे प्रमाण वाढत असतांना जिल्हा आरोग्य यंत्रणेने नियोजन न केल्यामुळे नॉन कोविड रुग्णांना खाटा (बेड) मिळणं कठीण झाले आहे. प्रत्येक रुग्णाला घराचा रस्ता दाखविण्यात येत असल्याने या प्रकारास जवाबदार कोण...?असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे.
News 34
चंद्रपूर जिल्ह्यात सुरवातीला कोरोनाने शिरकाव केला नाही. परंतु नंतर घरो घरी कोरोना पोहोचला आणि विपरीत परिणाम आरोग्य यंत्रणेवर पडला. दुसऱ्या लाटेत तर,दयनीय अवस्था होती.आरोग्य यंत्रणा तोकडी पडू लागली.सर्वच बाबतीत आरोग्य यंत्रणा फोल ठरली.ऑक्सिजन बेड तर सोडाच, साधे बेड पण मिळणे कठीण होऊन बसले. अनेकांना तर रुग्णवाहिकेमध्येच जीवनयात्रा सम्पवावी लागली. अश्यातच तोडगा म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात किमान 450 बेड चे कोविड रुग्णालय उभारण्यात आले आणि अनेकांचा जीव वाचला.हे रुग्णालय आता बंद अवस्थेत आहे.शासनाने हे रुग्णालय कोविड रुग्णांसाठीं उभारले असले तरी त्याचा उपयोग आता नॉन कोविड रुग्णांसाठी होऊ शकतो.डेंग्यू व इतर आजारांच्या रुग्णांसाठी हे रुग्णालय उपलब्ध झाल्यास अनेकांचा उपचार होऊन त्यांची निराशा टाळता येते. हे रुग्णालय नॉन कोविड रुग्णांसाठी मोकळे करावे,अशी मागणी आता जोर धरत आहे.
पालकमंत्री यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्याकडे जातीने लक्ष देण्याची आजच्या घडीला नितांत गरज आहे.
