चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यात ऑनलाइन सट्ट्याचं मोठं रॅकेट कार्यरत असून हा बेकायदेशीर धंदा संपूर्ण जिल्ह्यात आजही सक्रिय आहे.
वर्ष 2017 ला GST अस्तित्वात आल्यावर ऑनलाइन लॉटरी वर गदा आली, शासनाचा कर वाढल्याने हा धंदा बंद झाला होता.
मात्र आधी हा धंदा चालविणारे पुन्हा बेकायदेशीर पणे या धंद्यात मागील 2 वर्षांपासून उतरले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात या बेकायदेशीर धंद्याचे जवळपास 200 ते 250 दुकाने सुरू आहे.
या धंद्यात 10 घरात 10 रुपये लावले की 100 रुपये मिळतात, याची नोंद दुकान मालक एका चिठ्ठीवर करतो, महत्वाचे म्हणजे आता फक्त पेपर लॉटरी अस्तित्वात आहे आणि त्यांच्याच नावाने हे धंदे सुरू आहे.
चंद्रपुरातील भानापेठ वार्डात राहणारे गणेश व संजय हे या धंद्याचे मास्टरमाईंड आहे, दोघेही इंजिनियर असून ऑनलाइन लॉटरी सट्टा सेंटर धारकांना कम्प्युटर तयार करीत त्यामध्ये त्यांनी स्वतः तयार केलेलं सॉफ्टवेअर इन्स्टॉल करून देतात, आणि मग सुरू होतो खेळ आकड्यांचा, पडद्याआड चालणाऱ्या या खेळाचे शौकीनांची संख्या सुद्धा हजारोंच्या घरात आहे.
विशेष म्हणजे पैसे लावल्यावर दर 15 मिनिटाला लॉटरीचा आकडा ओपन होतो, 1 ते 99 पर्यंत आकडे या खेळात लावण्यात येतात ज्यांनी जास्त पैसे लावले असले तर तो डाव ग्राहकांना मिळत नाही याचं कारण म्हणजे हे आकडे सुद्धा ते 2 इंजिनियर स्वतः सेट करीत असतात, कमी पैश्याचा आकडा की जास्त रकमेचा हे ठरविणारे ते दोघेच. Online Lottery
जिल्ह्यात सुरू असलेल्या बेकायदेशीर ऑनलाइन लॉटरी धंद्याचे संपूर्ण नियंत्रण बल्लारपूर व वणी शहरातून केल्या जात आहे. News 34 chandrapur
चंद्रपुरात प्रत्येक ठिकाणी हे बेकायदेशीर दुकाने सुरू असतात या धंद्याला आशीर्वाद कुणाचा याच उत्तर प्रत्येक नागरिकांना माहीतचं आहे.
वैभवलक्ष्मी, शुभ लक्ष्मी हे पेपर लॉटरी चे नाव आहे, मात्र कुणालाही संशय येऊ नये यासाठी हे नाव सध्या लॉटरी माफिया वापरत आहे.
चंद्रपूर शहरात लॉटरीच्या या दुकानांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, 5 वर्षाआधी पोलिसांनी बल्लारपूर येथे ऑनलाइन लॉटरी चा पर्दाफाश केला, 2 वर्षाआधी पडोली येथे अशीच धाड पोलिसांनी टाकून लॉटरीचा अवैध व्यवसाय बंद केला होता मात्र आता तर हे बेकायदेशीर काम सर्रासपणे सुरू आहे.
आधी जे व्यवसायिक कायदेशीर हा धंदा करीत होते ते सुद्धा यामध्ये उतरले आहे, विशेष म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात हे धंदे सुरू असून देखील पोलीस प्रशासन गप्प का बसला आहे? हे न सुटणारे सध्या कोडे आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, पोलीस उपविभागीय अधिकारी शिलवंत नांदेडकर व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे सारखे कर्तव्यदक्ष अधिकारी असताना हे अवैध धंदे यांच्या नजरेतून बचावले तरी कसे?