चंद्रपूर :- भाजप नेते,माजी मुख्यमंत्री,माजी राज्यपाल स्व कल्याणसिंग जी च्या अंत्यदर्शनासाठी आलेल्या भाजप राष्ट्रीय अध्यक्ष श्री जे.पी.नड्डा साहेबांनी कोणत्याही गोष्टींची तमा न बाळगता,राष्ट्रीय ध्वजाच्या आचारसंहिता बद्दलच्या कोणत्याही नियमाला न पाळता,राष्ट्रीय ध्वज तिरंग्याचा मान न ठेवता देशाच्या प्रधानमंत्री समोर पार्थिवावर असलेल्या भारतीयांचा आन बाण शान असलेल्या "भारतीय राष्ट्रीय ध्वज तिरंगा" च्या वर "भाजपा चा झेंडा लावून /ठेऊन राष्ट्रीय राष्ट्रध्वजाचा अपमान करण्यात आला.
हा राष्ट्राचा अपमान आहे .हा लोकशाहीचा अपमान आहे, हा या राष्ट्रातील लोकांचा अपमान आहे. आणि म्हणून आम आदमी पार्टी चंद्रपुर राष्ट्रध्वजा बरोबर केलेली अपमानास्पद वागणूक खपवून घेणार नाही. News 34
आणि म्हणूनच आम आदमी पार्टी चंद्रपुर तर्फे बीजेपी चे राष्ट्रीय अध्यक्ष श्री जे. पी. नड्डा यांचे विरोधात राष्ट्रीय ध्वज अपमान प्रकरणी रामनगर पोलीस स्टेशन चंद्रपुर येथे ठाणेदार श्री शेवाळे साहेब यांचेकडे तक्रार नोंदवली असून भाजप राष्ट्रीय अध्यक्ष श्री जे पी नड्डा यांचेवर भा.द.वि. अनुसार कार्यवाही करण्यात यावी अशी विनंती ठाणेदारांना तक्रार निवेदनाद्वारे श्री सुनील रत्नाकर भोयर महानगर इंचार्ज तथा संघटनमंत्री यांचे व्दारे करण्यात आली आहे.
यावेळी पक्षाचे सहसंयोजक श्री योगेश आपटे, सहसंयोजक श्री सिकंदर सागोरे,सचिव श्री राजू कुडे, सहसचिव श्री अजय डुकरे, कोशाध्यक्ष श्री अशोक आनंदे, युथ विंग संयोजक श्री मयूर राईकवर,अंनिस चे जिल्हाध्यक्ष श्री साहेब,श्री कोंडेकर बाबुपेठ प्रभाग संयोजक श्री जयंत थुल आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.