चंद्रपूर - 18 ऑगस्टला आनंदनगर येथील पार्क प्लाझा मध्ये राहणारे 49 वर्षीय शालीक चंद्रशेखर गौरकार यांनी दुचाकी वाहन पार्किंग मधून चोरी झाल्याची तक्रार रामनगर पोलीस स्टेशनला दिली.
दुचाकी वाहन क्रमांक एम एच 34 जी 1550 कुणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी केली, तक्रारीच्याया आधारे रामनगर पोलिसांनी सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना मुखबिर द्वारे मिळालेल्या माहितीनुसार रामनगर पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली.
पोलिसांनी दोघांची कसून चौकशी केली असता सदर दुचाकी त्यांनीच चोरी केली असल्याची कबुली दिली.
आरोपीमध्ये नगीनाबाग येथे राहणारे 34 वर्षीय शेख अजीम शेख अशपाक, घुटकाला येथे राहणारे 30 वर्षीय शेख जुबेर शेख मुस्ताक यांचा समावेश असून त्यांच्याकडून चोरी गेलेले दुचाकी वाहन किंमत 5 हजार जप्त करण्यात आले.
सदर यशस्वी कामगिरी रामनगर पोलीस ठाण्याचे कर्मचारी सिडाम, प्रशांत शेंदरे, निलेश मुडे, विकास जुमनाके, लालू यादव, माजीद पठाण यांनी पार पाडली.