मूल (गुरू गुरनुले)
शेतकरी आणि सामान्य जनतेच्या हक्काची बँक म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने ऐन शेतीच्या हंगामात वाघाने हल्ला करून बैल मारल्याने नुकसान झालेल्या तालुक्यातील कांतापेठ येथील शेतकरी राजु वाढई यांना तातडीचे आर्थिक सहकार्य करण्यात आले. बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी कांतापेठ येथील नुकसानग्रस्त शेतकरी राजु वाढई यांचे घरी जावुन बँकेच्या वतीने CDCC BANK CHANDRAPUR आर्थिक मदतीचा धनादेश राजु वाढई यांना दिला. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभाफती तथा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष घनश्याम येनुरकर, संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे तालुका अध्यक्ष राकेश रत्नावार, राज मांदाडे, प्रकाश भेंडारे, बाबुराव भेंडारे, विनोद शेंडे, अतुल मोहुर्ले, प्रकाश पाचपोर, मिलींद माथनकर, धिरज कांबळे आणि दिनेश चाडगे आदि ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी राजु वाढई यांनी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत आणि संचालक वृंदाचे आभार मानले.