कोरपना ता.प्र.सै.मूम्ताज़ अली:-
चंद्रपूर जिल्ह्यातील अतिदुर्गम,आदिवासी बहुल माणिकगड पहाडावर विराजमान जिवती तालुक्यातील वणी खुर्द गावात २१ आगस्ट रोजी जादूटोण्याच्या संशयावरून एका दलित निष्पाप कुटुंबातील ७ जणांना भरचौकात खांबाने बांधून वयोवृद्ध महिला व पुरुषांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली.सदर घटना माणुसकीला काळीमा फासणारी व समाज मन सुन्न करणारी असून या घटनेचा सर्व स्तरातून तीव्र शब्दात निषेध केला जात आहे.सदर घटनेची उच्चस्तरीय चौकशी करावी, दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी शेतकरी संघटना जिवती तालुकाध्यक्ष सैय्यद शब्बीर जागीरदार यांनी News34 च्या माध्यमातून केली आहे.
विज्ञानाच्या २१ व्या शतकात आजूही कित्येक जण अंधश्रध्देच्या आहारी गेल्याचे चित्र पहायला मिळत आहे.पुरोगामी महाराष्ट्रात अशाप्रकारच्या घटना अत्यंत निंदनीय व निषेधार्थ असून अशा घटनांना रोखण्यात शासन, प्रशासन, राजकिय मंडळी तसेच तंटामुक्त समित्या कुठेतरी कमी पडत असल्याची खंत जागीरदार यांनी यानिमित्ताने व्यक्त केली आहे.भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी शासन, प्रशासनाने विशेष मोहिम राबवून जनतेचे प्रबोधन, वेळोवेळी मार्गदर्शन तसेच काही लोकांच्या मानगुटीवर बसलेले अंधश्रद्धेचे भूत व जाती द्वेशाची भावना दूर करण्याची नितांत गरज असल्याची भावना व्यक्त करत भवीष्यात अशा घटनांवर अंकुश बसावा यासाठी वणी येथे नुकत्याच घडलेल्या सदर घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी जागीरदार यांनी केली आहे.