कोरपना ता.प्र.सै.मूम्ताज़ अली:-
गडचांदूर न.प.च्या नगराध्यक्षांनी २० जुलै रोजी "विशेष सभा समिती" ची सभा बोलावली होती.यासभेतील ५ पैकी चौथा विषय म्हणजे इतर ठिकाणची दारू दुकान गडचांदूर येथे स्थलांतरीत करणे हा होता.नेमका यालाच विरोधी पक्ष नगरसेवकांनी विरोध दर्शविला होता. अगोदरच शहरात ११ पेक्षा जास्त विदेशी व ४ देशी दारूची दुकाने आहे.त्यावर नगरपरिषदेने तडकाफडकी विशेष सभा बोलावून इतर विकासात्मक विषयांसह पुन्हा दारू दुकांनचा ठराव घेतला आहे.दारू दुकानाला आमचा विरोध नसून फक्त हे दुकान आमच्या ले-आऊट मध्ये नको,इतर ठिकाणी हलवा या मागणीसाठी येत्या २५ आगस्ट पासून विरोधी पक्ष शिवसेनेच्या नगरसेविका सौ.वैशाली सु.गोरे त्या ले-आऊटच्या महिलांसह स्थानिक नगरपरिषदेपुढे उपोषणाला बसणार असल्याची माहिती पत्राद्वारे देण्यात आली आहे.यासंबंधीचे पत्र जिल्हाधिकारी चंद्रपूर, उपविभागीय अधिकारी राजूरा, मुख्याधिकारी व नगराध्यक्षा न.प.गडचांदूर, ठाणेदार गडचांदूर यांना देण्यात आले आहे. Shivsena corporater
महाराष्ट्र नगरपालिका नगरपंचायत औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ कलम ८(२) नुसार १/४(एक चतुर्थांश) सदस्यांनी विशेष सभा लावण्याबाबत विनंती अर्ज केल्यास नगराध्यक्षांना सभा लावता येते. परंतू याठिकाणी असे कोणत्याही सदस्यांचे अर्ज नसताना स्वतःच्या अधिकाराने सभा लावून त्यात एकूण ५ विषय ठेवले त्यातील विषय क्रं.४ हा स्थलांतरित दारू दुकानाचा होता.ही सभा केवळ आणि केवळ दारू दुकानाला ना-हरकत प्रमाणपत्र देण्यासाठीच लावल्याचा खळबळजनक आरोप विरोधी नगरसेवकांकडून होत आहे.विरोधकांच्या लेखी व तोंडी आक्षेपाला तसेच त्या प्रभागातील महिलांच्या आक्षेपाला बगल देत सत्ताधाऱ्यांनी सदर ठराव एकमताने मंजूर केला.त्यावेळी भाजप व शिवसेना नगरसेवकांनी याचा कडाडून विरोध केला होता.शिवसेना गटनेता सागर ठाकुरवार, सरवर भाई,सौ.रजी़या शेख खाजा हे तीन नगरसेवक अनुपस्थीत होते.तर अरविंद डोहे,रामसेवक मोरे दोन्ही नगरसेवक भाजप,सौ.गोरे,सौ.कोडापे व सौ.अहीरकर हे शिवसेनेच्या नगरसेविका यावेळी सभेत उपस्थीत होत्या.सदर उपोषण कोरोनाचे सर्व नियम पाळून संवैधानिक चालणार असल्याची माहिती देण्यात आली असून सत्ताधारी विरूद्ध अपक्ष असे चित्र यानिमित्ताने पहायला मिळत आहे.आता त्या ले-आऊटच्या नागरिकांची मागणी पुर्ण होणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
-------------//----------
"आमचा दारू दुकानाला विरोध नाही पण ज्याठिकाणी ही दुकान लागणार आहे त्याला विरोध आहे. तसेही परराज्यातील मंडळी याठिकाणी आपली दुकाने थाटून आहे मग आपल्या स्थानिक भूमिपुत्रांनी सदर दुकाने लावली तर यात गैर काय. आमचा नगरसेविका व त्या ले-आऊट मधील नागरिकांच्या मागणीला पुर्ण समर्थन असून जनहिताच्या भावना शासनप्रशासनाने समजून मागणी पुर्ण करावी."
गडचांदूर न.प.शिवसेना गटनेता,
नगरसेवक तथा शिवसेना
तालुकाध्यक्ष "सागर ठाकूरवार"