चंद्रपूर - जन आशीर्वाद दौऱ्यादरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी महाड, रत्नागिरी येथील पत्रकार परिषदेत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान करून नव्या वादाला सुरुवात केली.
राणे यांच्या विरोधात संपूर्ण राज्यात शिवसेना विरुद्ध भाजप असा सामना रंगला आहे, राज्यभर राणे विरोधात शिवसैनिकांचे हल्लाबोल आंदोलन सुरू आहे. Shivsena chandrapur
चंद्रपूर शहरात जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात शिवसैनिकांनी हातात कोंबड्या घेत नारायण राणे कोंबडी चोर अशी नारेबाजी केली. Sandip Girhe
केंद्रीय मंत्री राणे यांच्या फोटोला शिवसेना महिला आघाडीतर्फे चप्पलेचा मार देण्यात आला.
शिवसेना जिल्हाप्रमुख गिर्हे यांनी राणे यांचा निषेध करीत जर राणे मध्ये हिम्मत असेल तर त्यांनी चंद्रपुरात येऊन आमच्या समोरासमोर बोलावे, आम्ही त्यांना चोखपणे उत्तर देऊ.
आंदोलनात शिवसेना, युवासेना व महिला आघाडीचा सहभाग होता.