मूल (गुरू गुरनुले)
शेतकरी आणि सामान्य जनतेच्या हक्काची बँक म्हणुन ओडखल्या जाणाऱ्या चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने ऐन शेतीच्या हंगामात वाघाने हल्ला करून बैलाला मारल्याने नुकसान झालेल्या तालुक्यातील केळझर येथील शेतकरी गुरुदास बापू मराठे या बैल मालकाला तातडीचे दहा हजाराचे आर्थिक सहकार्य करण्यात आले. बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी news34 केळझर येथील नुकसानग्रस्त शेतकरी गुरूदास बापू मराठे यांचे घरी जावुन बँकेच्या वतीने आर्थिक मदतीचा धनादेश गुरूदास मराठे यांना दिला. यावेळी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा काँग्रेसचे तालुकाध्यक्ष घनश्याम येनुरकर, संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे तालुका अध्यक्ष राकेश रत्नावार, संचालक किशोर घडसे,माजी न.प.उपाध्यक्ष चंदू चतारे,बँकेचे नरेश पाळेवार, गुरुदास ठाकरे, आदर्श रायपुरे, निकेतन वाळके, आदि केळझर ग्रामस्थ उपस्थित होते.
निराधार झालेल्या शेतकरी यांना बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी तात्काळ आधार cdcc bank chandrapur दिल्याबद्दल गावकऱ्यांनी बँकेचे आभार मानले आहे.