कोरपना ता.प्र.सै.मूम्ताज़ अली:-
कोरपना तालुक्यात कित्येक लहान-लहान गावात ५,१० रुपयांमध्ये नगगरिक आरो फिल्टरच्या शुद्ध व थंड पाण्याचा लाभ घेत आहे.याच पार्श्वभूमीवर नांदा गावचे नागरिक यापासून वंचित असून स्वस्त दरात फिल्टरचे पाणी मिळण्याऐवजी आगाऊची रक्कम मोजावी लागत आहे. नांदा येथील सांस्कृतिक भवन परिसरात पंधराव्या वित्त आयोग निधीतून आरो फिल्टर प्लांटच्या कामाला त्वरित सुरूवात करा अशी मागणी होत आहे. News34
एकीकडे तालुक्यातील लहान-लहान गावात फिल्टर प्लांटची व्यवस्था करून देण्यात आली तर दुसरीकडे तालुक्यात सर्वात श्रीमंत व मोठ्या ग्रामपंचायतीच्या नियोजनशुन्य कारभारामुळे राजूरगुडा येथील वाटर फिल्टर प्लांट मागील ३ वर्षांपासून बंद अवस्थेत पडून आहे.असे आरोप होत असून नांदा येथील नागरिकांना शुद्ध पाणी मिळण्याच्या दृष्टीने आरो फिल्टर प्लांट नाही.येथील सांस्कृतिक भवनाच्या समोरील जागा एका खाजगी संस्थेला आरो प्लांटसाठी येथील एका ग्रामपंचायत सदस्याच्या तोंडी आदेशावरून देण्यात आली होती असे कळते.त्यासाठी समोरील संरक्षकभींत ही पाडण्यात आली. मात्र खाजगी संस्थेला सदर जागा दिल्याने नागरिकांनी याला विरोध दर्शविला.
सध्याच्या परिस्थितीत येथील नागरिकांना आगाऊ किंमतीत फिल्टरचे पाणी घ्यावे लागत असल्याचे चित्र असून संबंधितांनी याकडे लक्ष देऊन तातडीने आरो फिल्टर प्लांटचे काम सुरू करावे अशी मागणी करण्यात आली आहे.असे असताना प्रभाग क्रमांक ६ शांतीकॉलनी येथे स्थानिक अमदार सुभाष धोटे यांनी खनिज विकास निधीतून १८ लाखांचा निधी आरो फिल्टर प्लांट व इमारतीसाठी मंजूर केल्याची तसेच जिल्हापरिषदेने यासाठी मान्यता सुद्धा दिली आणि लवकरच हे काम सुरू होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.