घुग्घूस - घूग्घूस येथील अमराई वार्डात राहणाऱ्या मृतक सूरज माने व त्यांच्या पत्नी रत्नमाला माने यांच्या कुटुंबियांची आज आमदार किशोर जोरगेवार यांनी घुग्घूस येथे भेट घेतली असून आर्थिक मदत केली आहे. यावेळी सदर प्रकरणाबाबत आ. जोरगेवार यांनी पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्याशीही दुरध्वनि वरून चर्चा केली आहे. Mla Kishor Jorgewar
अमराई वार्डातील सुरेश माने व रत्नमाला माने या दाम्पत्याचा मृतदेह संशयास्पद रित्या आढळून आला होता. त्यानंतर घुग्घूस शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनास्थळी परिस्थिती पाहता ही हत्त्या असावी असा अंदाज वर्तविला जात आहे. दरम्यान आज आमदार किशोर जोरगेवार यांनी घुग्घूस येते जात मृतकच्या कुटुंबीयांची भेट घेतली या प्रकरणाची योग्य चौकशी करण्यात यावी याकरिता पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्याशी दूरध्वनी वरून चर्चा केली. काही असामाजिक तत्वांकडून परिसरातील नागरिकांसह मृतकच्या कुटुंबियांना भीती असल्याने त्यांनाही सुरक्षा देण्याबाबत यावेळी चर्चा झाली. घुग्घूस येथे जाऊन या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेणार असल्याचे पोलीस अधीक्षकांनी यावेळी सांगितले. सदर कुटुंबियांना घाबऱ्यांची गरज नाही प्रकणाची योग्य चौकशी करून सत्य बाहेर आणले जाईल असे यावेळी आ. जोरगेवार यांनी आशवस्त करत सदर कुटुंबाला आर्थिक मदत केली आहे. तसेच अनाथ मुलांचा योग्य रित्या सांभाळ करता यावा करिता मृतकाच्या वडिलांना नगर परिषदमध्ये कंत्राटी पद्धतीवर नौकरी देण्याबाबतही आ. किशोर जोरगेवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे.