बल्लारपूर - चंद्रपूर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून गो तस्करीचे प्रमाण वाढत असून गो रक्षकांनी मात्र गो तस्करी थांबविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. News 34
गायींनी भरलेला ट्रक ( एम एच ३४ बी एल २४५१) राष्ट्रीय महामार्गावरील दहेली कळमना गावादरम्यान पोलिसांनी पकडला. या ट्रक मधून जवळपास 40 गायींना मुक्त करून जीवनदान देण्यात आले. सदर गायींना लोहारा येथील गोशाळेत रवाना करण्यात आले. ही घटना आज गुरुवारी सकाळी 11.30 वाजताच्या दरम्यान घडली. Chandrapur
संशयाच्या आधारावर गोरक्षकांनी सदर ट्रक थांबवण्याचा प्रयत्न केला. पण प्रयत्न अयशस्वी ठरला. ट्रक चालकाने भरधाव वेगाने ट्रक पळविला. परंतु, ट्रकच्या मागचे चाक पंक्चर झाले. आणि ट्रक रस्त्याच्या बाजूला ठेवून चालक फरार झाला. गोरक्षकांनी लगेच त्यांचे सहकारी, बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आणि पोलिसांना कळवले. सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेंद्र तिवारी आपल्या टीमसह घटनास्थळी पोहोचले. ट्रकमधून 40 गायींची सुटका करण्यात आली. सदर गायी या तेलंगाना राज्य हैदराबादला कत्तलीसाठी नेण्यात येत होते. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच गायींना लोहारा येथील गोशाळेत पाठवण्यात आले आहे.
ही कारवाई बल्लारपूर पोलिस व Vishwa Hindu Parishad, Bajrang Dal आणि स्थानिक गोरक्षक कार्यकर्ता कैलास जोरा, सत्यनारायण खेंगर, राज निषाद, अमित चकवती, प्रशांत दारला, विकी मांढरे, विशांत ठाकूर, शशांक ठाकूर, जय ठाकूर, संदीप ठाकूर इत्यादी कार्यकर्त्यांच्या सहकार्याने करण्यात आली.