चंद्रपूर - चंद्रपुर जिल्हयात जवळपास 395 सेवा सहकारी संस्थांचे व आदीवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे माध्यमातुन पीक कर्ज वाटप, पिक विमा, शेतीपयोगी यंत्र/अवजार कर्ज वाटप, कर्जमाफी इ. शासनाच्या योजना शेतक-यांकरीता राबण्यिात येतात. यापैकी 130 संस्थांमध्ये जिल्हा उपनिबंधक यांचे मान्यतेने स्वतंत्र सचिवांची नियुक्ती करण्यात आलेली असुन 47 संस्थांवर जिल्हा देखरेख संस्थेचे सचिव आणि 56 संस्थांमध्ये सेवानिवृत्त झालेले सचिव कंत्राटी म्हणुन कार्यरत आहेत. News34
सध्याची सेवा सहकारी व आदिवासी सहकारी संस्थांची आर्थिक स्थिती लक्षात घेता स्वतंत्र सचिवांचे वेतनाचा प्रश्न पुढील काळात निर्माण होऊ शकतो. यादृष्टीने स्वतंत्र सचिवांचे भविष्याचा विचार करता या स्वतंत्र सचिवांचे समायोजन जिल्हा देखरेख समिती अंतर्गत कॅडर मध्ये करण्यात यावे अशी मागणी स्वतंत्र सचिवांच्या शिष्टमंडळांने केली आहे. महाराष्ट्र् प्रदेश काॅंग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे सरचिटणीस उमाकांत धांडे यांचे नेतृत्वात याबाबतचे निवेदन जिल्हयाचे पालकमंत्री ना. विजयभाऊ वडेट्टीवार, खासदार बाळुभाऊ धानोरकर आणि राजु-याचे आमदार सुभाष धोटे, चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष यांना देण्यात आले.