प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल - मुल तालुका शिवसेनेच्या वतीने राजोली - मारोडा जिल्हा परिषद क्षेत्रात राजोली येथे जि.प. व पं.स.निवडणुकीमध्ये यश संपादन करण्यासाठी आढावा बैठकीचे आयोजन केलेले होते . या बैठकीला शिवसेना जिल्हाप्रमुख संदिप गिर्हे यांच्या मार्गदर्शनात मुल शिवसेना तालुका प्रमुख नितीन येरोजवार यांनी आढावा बैठकीचे आयोजन केलेले होते.या आढावा बैठकीचे संचालन शेषराज कुंभारे यांनी केले. या बैठकीला प्रमुख उद्देश संघटन वाढवीने तसेच मुल तालुक्यातील प्रथमच मागील निवडणुकीत यश मिळवुन दोन सरपंच व तिन उपसरपंच तसेच एकुन 26 सदस्य निवडुन आणुन मुल तालुक्यात प्रथमच यश संपादन केले त्या यासारखे आगामी निवडणुकीत यश संपादन करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आलेले होते.मागील कोरोना काळात मुख्यमंत्री उध्दवसाहेब ठाकरे यांच्या अतिशय संयमी पध्दतीने परीस्थिती हाताळली तसेच शासकीय योजनांचा आराखडा सर्व तालुक्यातील news34 जनमानसाच्या मनात रूजवा व पक्षसंघटन वाढवुन गाव येथे शाखा घर तेथे शिवसैनिक असे बिदवाक्य घेऊन संघटन वाढवावे असे आवाहन मुल शिवसेना तालुकाप्रमुख नितीन येरोजवार यांनी केले या आढावा बैठकीला असंख्य शिवसैनिक हजर होते.आपल्या महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यावर प्रेरित तसेच मुल शिवसेना तालुकाप्रमुख नितीन येरोजवार तथा राजोली - मारोडा जि.प. उपतालुकाप्रमुख सत्यनारायण अमरूदिवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन राजोली येथील अनेक युवकांनी प्रवेश घेतला त्यामध्ये विजय कीसन सहारे, दिलीप गोंगले, अब्दुल शौकत सत्तार शेख,सुरेश सोमना येनगंटिवार,देवराव रामचंद्र कीन्नाके, नारायण मारबोनवार,चोखदेव सोनटक्के, विष्णु हिरामन आत्राम,विठोबा सखाराम शेंडे ,बादल राजेश कालबोगवार, सुधीर शंकरराव खोब्रागडे, सुरज प्रभाकर गरमळे,गणपत विश्वनाथ टेकाम, पुंडलीक संभाजी येनुरकर यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला.
तसेच या आढावा बैठकीला उपस्थित मुल शहर प्रमुख राहुल महाजनवार,शहर समन्वयक अरविंद करपे, तालुका समन्वयक अनिल सोनुले , विनोद काळबांधे तथा अनेक पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थीत होते.