चंद्रपूर - अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर चंद्रपूर जिल्ह्यात पावसाचे जोरदार आगमन झाले, उन्हाच्या तडाख्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी या पावसाचा अनेकांना चांगलाच फटका बसला आहे. News34
प्रशासनाच्या चुकीच्या नियोजनामुळे शासकीय कार्यालयात पाणी शिरल्याने एकच तारांबळ उडाली होती.
18 ऑगस्टला रात्री मुसळधार पाऊस सुरू झाला होता, चंद्रपुरातील वाहतूक नियंत्रण शाखेत पावसाचे पाणी संपूर्ण कार्यालयात शिरले होते, त्यामुळे वाहतूक पोलिसांना कार्यालयात जाण्यासाठी पावसाच्या पाण्यातून वाट शोधावी लागली.
पावसाचे पाणी वाहतूक कार्यालयात कसे काय शिरले असेल? या प्रश्नाचे उत्तर म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या चुकीच्या कामामुळे, तुकूम ते वाहतूक नियंत्रक कार्यालय पर्यंतचा मार्ग हा जमिनीपेक्षा उंच झाल्याने पावसाचे पाणी वाहतूक नियंत्रक कार्यालयात शिरले.
या मानवी सदृश पुराला सार्वजनिक बांधकाम विभाग व चंद्रपूर मनपा जबाबदार असल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी सांगितली.
