चंद्रपूर - स्वाती त्रिवेदी (सध्या सेवादल महिला काँग्रेस ची जिल्हाध्यक्षा) माझी महिला काँग्रेस ची सहकारी जी या फोटोत काम करण्यात व्यस्त आहे. तिच्या विषयी लिहावंसं वाटतय कारण  स्वातीने खाजगी शाळेत करत असलेली नौकरी आज सोडली. मागच्या तीन वर्षांपासून ती ही नौकरी करत होती, पगार फार नव्हता पण स्वतः कमावणे काय असते मी समजू शकते. कारण घरी पैसे संपले की मागताना आज पण मला कसेतरी होतेच इतकं शिक्षण घेऊन आपण नौकरी करू शकलो नाही याचे दुःख माझ्या मनात नेहमी राहील. 
News 34
त्यामुळे स्त्रीची नौकरी हे केवळ मिळकतीचे साधन नसून आत्मसन्मानाने जगण्याचे माध्यम असते असे मी समजते, त्यामुळे स्वातीच्या वेदना अर्थात मी समजू शकते. आज राजीनामा दिल्यावर तिला फोन केला ती खूप रडत होती नौकरी सोडायची हे तिने नक्की केले होते पण तरीही असे नियमित काम करत असल की ते सोडतांना दुःख होतच.
Chandrapur news34
 त्या मागचे कारण हे होते की स्वातीला पूर्ण वेळ काँग्रेस मध्ये आणि अर्थातच माझ्या सोबत काम करायचे होते. दोन्ही करणे जमत नव्हते ज्या पद्धतीने महिला काँग्रेस चे काम वाढतेय त्यात तिला नौकरी, घर, आणि पक्षाचे कार्य जमत नव्हते. मग तिने ठरवलं नौकरी सोडायची संध्याकाळी घरी आली मला म्हणाली ताई " अब मैं आपकी पीए बन गयी अब जॉब तो नही हैं मुझे हमेशा साथ रखो", मेरा जवाब था " चिंता मत करो तुम साथ भी राहोगी और मेरे दिलं मे भी' . 
माझ्या घरी बसून असतांना तिला तिच्या एका सहकारी मैत्रिणीचा फोन आला, समोरचीने विचारलं, पार्टी के लिये जॉब छोडी कुछ मिल राहा क्या? तिने नम्रपणे उत्तर दिलं, कुछ नही मान मिलता सन्मान मिलता वही काफी हैं आगे कुछ कर लुंगी"  स्वाती चे सासरे काँग्रेस चे जुने कार्यकर्ते होते, तिचा नवरा देखील अनेक वर्षांपासून काँग्रेस चे काम करतोय अर्थात कुठलेही पद न घेता आणि आता स्वाती पूर्ण वेळ पक्षाचे  काम करण्यासाठी नौकरी सोडते. 
कोण म्हणतं काँग्रेस आता तुटुतेय?? सर्वोच्च पद भोगलेले लोक जेव्हा पक्षावर नाराज होऊन पक्ष सोडून इतरांच्या वळचणीला जातात  त्यावेळी त्यांच्यापेक्षा पक्षासाठी काम करणाऱ्या स्वाती सारख्या सच्चा काँग्रेसी नक्कीच मोठ्या ठरतात . काँग्रेस होती, काँग्रेस आहे आणि  काँग्रेस राहणार कारण त्यात स्वाती सारख्या नेक दिल आणि त्याग करणाऱ्या  मुली आहेत. My Big Salute to you Swati Trivedi ( अर्थात मला हे लिहिताना गलबलून येतंय लोक मला देखील बोलतात राजकारणात इतकं भावूक होऊन चालत नाही पण सध्या तरी ते आपल्याला जमत नाहीयेय त्यामुळे च दुसऱ्यांचे अश्रू बघून डोळ्यात पाणी येतं.
नम्रता ठेमस्कर
