चंद्रपूर - 15 ऑगस्ट देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली, या निमित्ताने माणिनी बहुद्देशीय महिला मंडलद्वारे हनुमान मंदिर तुकूम येथे सेवानिवृत्त कर्मचारी, गृहिणी व लहान मुले यांच्यासाठी राष्ट्रगीत गायन स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमात प्रभाग क्रमांक 1 च्या नगरसेविका शिला चव्हाण, माणिनी महिला मंडळाच्या अध्यक्षा चैताली नवले प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना चैताली नवले यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील वाढत्या प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त करीत सर्वांनी वृक्षारोपण करीत पर्यावरणाचा समतोल कसा राखावा याचं महत्व पटवून दिले, आपलं माणिनी महिला मंडळ हे नेहमी गरजवंतांची मदत करण्यासाठी नेहमी अग्रेसर असणार अशी ग्वाही सुद्धा त्यांनी यावेळी दिली. News34
आयोजित कार्यक्रमात वैशाली गोरडवार, वनिता भोगेकर, सविता पोळे, भारती उपाध्ये, सास्तिकर, लांडे काकू, लेनगुरे, दार्व्हटकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
