चंद्रपूर - देशात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने देशात लॉकडाउन लावण्यात आला, यामुळे अनेकांचे रोजगार हिरावले, व्यवसाय बुडाले मात्र कोरोनाच्या संसर्गाने लाखो नागरिकांनी आपला जीव सुद्धा गमाविला.
आता कोरोना बाधितांच्या रुग्ण संख्येत घट होत असून निर्बंध शिथिल करण्यात आले होते, सर्व व्यावसायिकांची प्रतिष्ठाने रात्री 8 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली होती, चंद्रपूर जिल्ह्यात मात्र शहरी व ग्रामीण भागात वेगळा कायदा होता. News 34
शहरी भागात 4 वाजेपर्यंत हॉटेल व्यवसायिकांची आसनव्यवस्था होती, त्यानंतर 8 वाजेपर्यंत पार्सल व्यवस्था मात्र याउलट ग्रामीण भागात पोलीस प्रशासनामुळे 6 वाजता पासून सर्व हॉटेल बंद करण्याचा कायदा पोलिसांनी सुरू केला.
चंद्रपूर महानगर भागात 8 वाजेपर्यंत प्रतिष्ठाने व हॉटेल सुरू असायचे, मात्र ग्रामीण भागात सायंकाळी 6 वाजले की रामनगर पोलीस प्रशासन सर्व हॉटेल्स बंद करण्याचे काम करायचे, पोलिसांच्या त्रासापायी लोहारा भागातील हॉटेल व्यवसायिकांनी आसन व्यवस्था बंद केली फक्त पार्सल व्यवस्था सुरू ठेवली, हॉटेल व्यवसायिकांनी कठोर भूमिका घेतली मात्र पोलिसांनी यावर सुद्धा उलट फर्मान काढत, सायंकाळच्या सुमारास पार्सल द्यायच्या वेळेस लाईट बंद ठेवावा लागेल अशी अट पोलिसांतर्फे ठेवण्यात आली होती.
पोलिसांच्या त्रासापायी अखेर हॉटेल व्यवसायिकांनी मागील 8 दिवसापासून आसन व्यवस्थाचं बंद करून टाकली.
नाव न सांगण्याच्या अटी वरून हॉटेल व्यवसायिकांनी माहिती दिली की शहरी भागात पोलिसांचा कायदा वेगळा आणि ग्रामीण भागात वेगळा, आधीच लॉकडाउन मुळे आम्हा व्यवसायिकांचे कम्बरडे मोडले आहे आणि वरून पोलीस प्रशासन आम्हाला वारंवार हॉटेल 6 वाजता बंद करण्यास भाग पाडतात.
हॉटेल व्यवसायामुळे अनेक कुटुंबांचे रोजगार चालतात वरून प्रशासन अशी भूमिका घेत असेल तर जगायचं कस? हा प्रश्न आम्हाला पडला आहे.
आम्ही नियमांच्या अधीन राहून व्यवसाय करतो मात्र पोलीस प्रशासनाच्या या भूमिकेचा आम्ही तीव्र निषेध करतो, शहरात पोलिस हॉटेल व्यावसायिकांना नियमांत वेगळी मुभा देतात व आमच्यावर कारवाई करण्याची भूमिका यावर जिल्हा पोलिस अधीक्षकांनी लक्ष द्यायला हवे अशी मागणी करीत आहो.

