मुल - जुलै महिन्यात आलेल्या वादळी पावसामुळे मूल तालुक्यातील बोडला येथील अल्प भूधारक शेतकरी विलास नागपुरे व गयाबाई पोरटे हे शेतात काम करीत असतांना अचानक त्यांच्या अंगावर वीज पडल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला. त्यामुळे दोन्ही कुटुंबाचा आधारच हिरावून गेल्याने नागपुरे व पोरटे दोन्ही कुटुंब मोठया आर्थिक संकटात सापडले. याबाबतची माहिती सरपंच जालिंदर बांगरे यांनी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांना दिली असता CDCC बँकेच्या शेतकरी कल्याण निधीमधून मृतकाचे वारस नेमाजी नामदेव पोरटे यांना दहा हजार व संदीप विलास नागपुरे यांना दहा रुपयांची तात्काळ मदत बँकेचे अध्यक्ष संतोषशिंह रावत यांनी त्यांच्या घरी जाऊन ग्रामस्थांच्या उपस्थितीत दिली. तसेच शासनाकडून सुद्धा आकस्मिक मदत मिळते याची कल्पना रावत यांना असल्याने बोनडाला येथूनच मृतकांच्या news34 घरूनच मुल तहसिलचे तहसीलदार डाँ. रवींद्र होळी यांचेशी मोबाइल वर बोलून शासनाकडून आर्थिक मदत त्वरित मिळवून देण्यात यावी अशी विनंती केली. यावर तहसिलदार होळी यांनी दोन दिवसांतच मदत देण्यात येईल असे सांगण्यात आले होते. याची गंभीर दखल घेऊन तहसीलदार यांनी दुसऱ्याच दिवशी मृतकांच्या नातेवाईकांना आणि गावातील सरपंच यांना तहसील कार्यालय मुल येथे बोलावले आणि मृतकाचे वारसदार श्रीमती ताराबाई विलास नागपुरे यांना चार लाख, चार हजार ,तीनशे रुपये व दुसऱ्या मृतकाचे वारसदार नामदेव तानु पोरटे यांना चार लाख, चार हजार, तीनशे रुपयांची आर्थिक मदत चेक द्वारे तहसीलदार होळी यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार साधनकार यांचे हस्ते दोन्ही वारसदारांना देण्यात आले. यावेळी सरपंच जालिंदर बांगरे, पंचायत समितीचे माजी उपसभापती दशरथ वाकुडकर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष निलेश बांगरे, बेंबाळं येथील सरपंच करुणा उराडे उपस्थित होत्या.
CDCC BANK आणि शासनाची आर्थिक मदत बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी मृतकांच्या वारसदारांना त्वरित मिळवून दिल्याबद्दल मृतकाचे वारसदार, सरपंच जालिंदर बांगरे, माजी उपसभापती दशरथ वाकुडकर, आणि गावकरी यांनी संतोषशिंह रावत व तहसीलदार रवींद्र होळी यांचे जाहीर आभार मानले आहे.

