चंद्रपूर - वरोरा नाका चौकातील स्व. बाळासाहेब ठाकरे उड्डाणपुलाचा एक भाग अनेक वर्षांपासून उदघाटनाच्या प्रतीक्षेत होता, प्रशासनाच्या दिरंगाईने तो भाग सुरू करण्यात आला नाही त्यामुळे उड्डाणपुलाचा तो भाग प्रेमी युगल, दारुडे व अवैध धंदे करणाऱ्यांचा अड्डा बनला होता.
काही दिवसांपूर्वी पुलाच्या त्या भागावर प्रेमी युगलांच्या अश्लील चाळ्याचा व्हिडीओ समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला होता. News 34
सदर पुलाचा भाग लवकर सुरू व्हावा यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी पुढाकार घेत सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंता जाधव यांना खडेबोल सूनावित 15 ऑगस्टच्या आधी तो भाग सुरू करावा अन्यथा शिवसैनिक स्वतः पुलाच्या त्या भागाचे उदघाटन करतील असा इशारा सुद्धा त्यावेळी देण्यात आला होता.
शिवसेनेच्या इशाऱ्याची दखल घेत 15 ऑगस्टच्या पूर्वसंध्येला तो भाग सुरू करण्यात आला.
मागणीची दखल होताच शिवसैनिकांनी स्व. बाळासाहेब ठाकरे उड्डाणपुलाच्या त्या भागावर आनंद साजरा केला.
यावेळी शिवसैनिक राहुल विरुटकर, गणेश ठाकूर आदींची उपस्थिती होती.

